भर चौकात दोन पोलिसांना एकाची मारहाण; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Published: July 14, 2023 06:40 PM2023-07-14T18:40:11+5:302023-07-14T18:40:23+5:30
धानोरा आऊट पोस्टचे जमादार वंतू गावित हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्याशी गोकुळ वळवी यांने वाद घातला.
नंदुरबार : आपसात भांडण करणाऱ्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी मालपूर, ता.नंदुरबार येथील एकाविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानोरा येथे ही घटना घडली. धानोरा येथील बसस्थानक परिसरात गोकुळ जयसिंग वळवी व सागर राजेंद्र गावित हे आपसात भांडण करीत होते. तेथे धानोरा आऊट पोस्टचे जमादार वंतू गावित हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्याशी गोकुळ वळवी यांने वाद घातला.
सागर गावित यांना सोडून त्यांनी पोलिस जमादार वंतू गावित यांच्याशी त्याने वाद घालत मारहाण केली. जमादार जगन वळवी हे देखील तेथे गेल्यावर त्यांनाही गोकुळ वळवी याने धक्काबुकी करून शिवीगाळ केली. याबाबत वंतू गावित यांनी फिर्याद दिल्याने गोकुळ वळवी (४०) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अनिल गोसावी करीत आहेत. वळवी यास अटक करण्यात आली.