जमावाच्या हल्ल्यात विसरवाडी येथे दोन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:58 PM2018-03-07T16:58:41+5:302018-03-07T16:58:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : जमावाकडून एका घराची तोडफोड व मारहाण सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा:यांवर हल्ला झाला़ यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचा:यांना धक्काबुक्की झाली़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़
विसरवाडी येथील महेंद्र गिरधारीलाल जाट यांच्या घरावर वागदी ता.नवापूर येथील 100 जणांच्या जमावाने अचानक हल्ला चढवला़ मागील भांडणाचा वाद उकरून काढत जमावाने जाट यांच्या घराची तोडफोड करून त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करण्यास सुरूवात केली होती़ याठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विसरवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील पोलीस कर्मचा:यांसह घटनास्थळी हजर झाल़े जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक जमावाने सहायक निरीक्षक पाटील यांच्यावर हल्ला चढवला़ प्रसंगावधान राखत त्यांच्यासोबत असलेले तुषार सोनवणे व भगवान गुट्टे या दोघांनी धनंजय पाटील यांना बाजूला केल़े यावेळी जमावाने सोनवणे व गुट्टे या दोघांना बेदम मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाल़े सहायक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील व इतर पाच कर्मचा:यांना जमावाने धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला़ गंभीर जखमी झालेल्या दोघा पोलीस कर्मचा:यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ घटनेनंतर जमाव पसार झाला़ या हल्ल्यात महेंद्रकुमार जाट यांच्या घरातील वस्तूंसह वाहनांचे नुकसान झाल़े माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला़ गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आह़े