एकाच रात्री दोन दुकाने फोडली
By admin | Published: March 20, 2017 11:10 PM2017-03-20T23:10:03+5:302017-03-20T23:10:03+5:30
प्रकाशा येथे चोरांचा उच्छाद : वारंवार होणा:या चो:यांमुळे नागरिक त्रस्त
प्रकाशा : प्रकाशा येथील मेन रोडवरील कृषी दुकानासह किराणा दुकानातून भुरटय़ा चोरटय़ांनी 20 रोजी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून रोकड व मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
शहादा तालुक्यातील प्रकाशा ते केदारेश्वर मंदिर मार्गावरील रवींद्र पाटील यांच्या संत आसारामजी कृषी सेवा केंद्र व वसंत वाणी यांच्या किराणा दुकानाचे अज्ञात चोरटय़ांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत कृषी केंद्रातील रासायनिक औषधींसह 30 ते 40 हजार रुपये व बिस्कीटच्या दुकानातील किरकोळ रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
दरम्यान, चोरटय़ांनी दोन्ही दुकानातील तिजो:या व सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आल्याने परिसरातील व्यापारिवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चोरीची घटना झाल्याचे कळताच पोलीस दूरक्षेत्राचे जमादार गौतम बोराळे व कर्मचारी गुलाले यांनी भेट देऊन पाहणी केली.
या वेळी उपस्थित व्यापा:यांनी या भुरटय़ा चोरटय़ांचा लवकरात लवकर तपास लावून बंदोबस्त करण्याची मागणी केली.
(वार्ताहर)
4प्रकाशा येथे भुरटय़ा चो:यांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलीस कर्मचारी वाढविण्याची गरज असून, या दूरक्षेत्रांतर्गत 24 गावे येतात. या गावांसाठी केवळ चार पोलीस कर्मचारी असून, त्यापैकी एक जण साप्ताहिक सुटीवर, तर एक कर्मचारी दोन महिन्यांच्या सुटीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्तव्यावर असलेले दोन कर्मचारी 24 गावांना कसे सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दूरक्षेत्रातील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
4संत आसारामजी कृषी सेवा केंद्रातील काऊंटरवर असलेल्या काचेखाली रवींद्र पाटील यांनी देश-विदेशच्या विविध चलनी नोटांसह भारतीय चलनातील बाद झालेल्या नोटाही ठेवलेल्या होत्या. मात्र या नोटांना चोरटय़ांनी हात लावलेला नाही असे दिसून आले.