बारडोलीनजीक दोन एस.टी.बसेसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:43 PM2018-05-06T12:43:42+5:302018-05-06T12:43:42+5:30
पाचजण जखमी : बसला ट्रकची धडक, प्रवासी घेण्यासाठी आलेल्या बसलाही टेम्पोची धडक
उभ्या असलेल्या बसवर ट्राला धडकुन झालेल्या अपघातातील प्रवाशांना घेण्यासाठी गेलेल्या नवापूर आगाराच्या बसला लग्नाचे व:हाड घेऊन जाणा:या टेम्पोने धडक दिल्याची घटना रात्री साडेतीन वाजता बारडोली जवळ घडली. अपघातात टेम्पो मधील तिघे गंभीर जखमी असुन नवापूर आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांच्यासह इतर पाचजण किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी धुळे आगाराची अहमदाबाद-धुळे ही बस धुळ्याकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बारडोली पासून आठ किमी अंतरावरील हिंडोलीया गावाजवळ मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास पंर झाली. बस मध्ये पाच ज्येष्ठ प्रवासी मिळुन एकुण 58 प्रवासी होते. चार महिन्याचे बाळ असलेली एक महिला बसमध्ये बसली होती तर अन्य प्रवासी बसच्या खाली उतरुन रस्त्याच्या कडेला उभे होते. बस चालक एम. बी. पवार व वाहक पी. आर. सोनार मागील पंर चाक बदलत असतांना 18 टायरचा ट्रक ट्रॉला बसच्या मागे जोरात धडकला. या अपघातात बसमधे बसुन असलेली महिला किरकोळ जखमी झाली तर ट्रक चालकाच्या हातास दुखापत झाली. राज्य परिवहनच्या बसचे अंदाजे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. बारडोली पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पुन्हा दुसरा अपघात..
मध्य रात्रीच्या सुमारास नवापूर मार्गे धुळेकडे जाणा:या राज्य परिवहनच्या अन्य बसेस मध्ये प्रवासी जास्त असल्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना नेण्यासाठी नवापूर आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना कळविण्यात आले. वाहतूक निरीक्षक नाना भामरे, वाहतूक लिपीक भाविन पाटील, तीन तांत्रिक कर्मचारी, चालक जे. पी. मेश्राम व वाहक एस. एच. आडे यांना सोबत घेऊन अहमदाबाद धुळे वाहनाचा अपघात हाताळण्यासाठी नवापूर येथुन तीन वाजेच्या सुमारास नवापूर आगाराची बस रवाना झाले. मध्यरात्री अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रस्त्याच्या दुस:या बाजूस बस उभी करुन वाहतूक निरीक्षक नाना भामरे यांनी अपघातग्रस्त बसची खातरजमा करून नवीन आणलेली बस तेथे नेली. बस वळविण्यासाठी पुढे काढताच जळगाव येथे लग्न समारंभ आटोपून बारडोलीकडे परतीचा प्रवास करीत असलेला आयशर टेम्पो मागच्या बाजुने बसवर जोरात धडकला. त्यात आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे बसमधे फेकले गेल्याने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मुका मार बसला. तर तांत्रिक कर्मचारी जी. बी. बहिरम यांच्या कमरेला मुका मार बसला. टेम्पो चालकासह कॅबीनमधील तीन प्रवासी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बारडोली व पुढे सुरत येथे हलविण्यात आले. टेम्पोच्या केबीनचा चक्काचूर होऊन मागे ठेवलेल्या लग्न सामानाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. टेम्पो मधील व:हाडी मात्र सुखरुप बचावलेत. नवापूर आगाराच्या बसचे अंदाजे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले.