नंदुरबारात दोघा शिक्षणाधिका:यांसह 31 शिक्षकांवर फसवूणकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:28 PM2018-02-16T12:28:15+5:302018-02-16T12:28:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रांद्वारे नियुक्ती मिळवणा:या 31 शिक्षकांसह दोघा शिक्षणाधिका:यांविरोधात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरूवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला़
अपंग युनिटमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 71 जणांनी शासनाचे बोगस नियुक्ती आदेश व इतर कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर केली होती़ या कागदपत्रांची व आदेशाची कुठलीही शहनिशा न करता, तत्कालीन शिक्षणाधिकारी अरूण पाटील व तेजराव गाडेकर यांच्यासह इतरांनी नियुक्तीचे आदेश देण्यासाठी प्रक्रिया राबवली़ जिल्हा परिषदेने चौकशी करून गुरूवारी रात्री उशिरा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यावरून अरूण पाटील व तेजराव गाडेकर यांच्यासह कक्षाधिकारी हितेश गोसावी, आऱबी़वाघ, नर्मदा राऊत, व कोळी यांच्यासह 31 शिक्षकांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करत आहेत़