नंदुरबारातील दोन हजार आदिवासी विद्यार्थी टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:19 PM2018-08-12T13:19:12+5:302018-08-12T13:19:18+5:30

सात दिवसात मुदत संपणार : नंदुरबारातील सात वसतिगृहात फक्त 262 मुले-मुली नव्याने दाखल

Two thousand tribal students from Nandurbar stand in Tangani | नंदुरबारातील दोन हजार आदिवासी विद्यार्थी टांगणीला

नंदुरबारातील दोन हजार आदिवासी विद्यार्थी टांगणीला

googlenewsNext

नंदुरबार : वारंवार बंद पडणा:या संकेतस्थळाची समस्या दूर न करताच आदिवासी विकास विभागाने वसतीगृह प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आह़े यामुळे नंदुरबार प्रकल्पातील दोन हजार 300 विद्याथ्र्याचे भवितव्य टांगणीला आह़े यातही बारावी उत्तीर्ण विद्याथ्र्याचे नुकसान झाले असून त्यांच्या प्रवेशाची  मुदत 30 जुलै रोजी संपली आह़े       
जून अखेरीस आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती़ दरम्यान संकेतस्थळ योग्यरितीने चालत नव्हते, असे असतानाही विभागाने कोणतीही कारवाई न करताच प्रवेश प्रक्रिया रेटली़  यातून 8 ऑगस्टअखेर 2 हजार 478 विद्याथ्र्याचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आह़े परंतू  यातील 291 मुले- मुलीच नवीन आहेत़ उर्वरित 2 हजार 192 जुन्याच मुला-मुलींचे प्रवेश करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आदिवासी विकास विभागाने चालवला आह़े विद्याथ्र्याचे पूर्ण क्षमतेने प्रवेश झालेले नसतानाही विभाग मुदत संपवण्याची घाई करत आह़े संकेतस्थळाच्या समस्येमुळे  समाजकल्याण विभागाच्या धर्तीवर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया करण्याची मागणी असतानाही विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होत़े येत्या 10 ऑगस्टर्पयत महाविद्यालयीन तर 15 ऑगस्टर्पयत व्यावसायिक कोर्सेला प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यानाच प्रवेश मिळणार आह़े शासन डिबीटीही मागे घेत नाही, आणि प्रवेशाची मुदतही वाढवत नाही यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत़ नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार या शहर आणि तालुक्यांमध्ये 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ या सर्व 29 वसतिगृहात इमारत क्षमतेनुसार 4 हजार 785 विद्याथ्र्याना प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आह़े  प्रारंभी केवळ जुने विद्यार्थी आणि विशेष बाबीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला होता़ आजअखेरीस 29 वसतिगृहात 2 हजार 478 विद्याथ्र्याचे प्रवेश झालेले आहेत़ उर्वरित 2 हजार 307 विद्याथ्र्याच्या जागा रिक्त आहेत़
प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व विद्याथ्र्याच्या खात्यावर 1 कोटी 60 लाख 30 हजार 264 रूपये वर्ग करण्यात आले आहेत़ 24 मुला मुलींचे प्रवेश होऊनही त्यांना अद्याप डिबीटी माध्यमातून भोजन आणि निर्वाहभत्ता देण्यात आलेला नाही़ यात नंदुरबार शहरातील 7 वसतीगृहात भोजन डिबीटी, स्टेशनरी, निर्वाहभत्ता असे 26 लाख रूपये विद्याथ्र्याच्या खात्यात जमा करण्यात आले आह़े इतर 22 वसतीगृहात केवळ निर्वाह भत्ता आणि स्टेशनरीचे पैेसे देण्यात आले आहेत़   
आदिवासी विकास विभागाने काढलेल्या आदेशांनुसार जिल्हास्तरावरील  वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याच्या खात्यात प्रतिमाह 3 हजार भोजन भत्ता तर 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आह़े याचसोबत तालुकास्तरावर आणि ग्रामीण क्षेत्रातील वसतिगृह आणि शासकीय आश्रमशाळेत प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याना साधनसामग्रीबद्दल 4 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू पालकांनी दिलेल्या माहितीनुसार आश्रमशाळेतील बालकांच्या खात्यावर अद्यापही पैसे देण्यात आलेले नाहीत़ डिबीटी योजना लागू असलेली केवळ सात वसतीगृहे जिल्ह्यात आह़े सातही वसतीगृह नंदुरबार शहरात आहेत़ यात 4 ठिकाणी मुले तर 3 ठिकाणी मुलींचा प्रवेश होतो़ यात नंदुरबारातील कोरीट रोड येथील वसतीगृहात 125 विद्यार्थी क्षमता आह़े याठिकाणी 86 मुलांचे प्रवेश झाले आहेत़ सिंधी कॉलनी वसतीगृह 120 पैकी 43, शिक्षक कॉलनी 120 पैकी 54 तर 1 हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या पटेलवाडी संकुलात 619 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले आहेत़ यात केवळ 447 जुनेच विद्यार्थी आहेत़ शहरात फक्त 172 नवीन विद्याथ्र्याचे प्रवेश येथे होऊ शकले आहेत़  
शहरात मुलींचे तीन वसतीगृह आहेत़ यात सरस्वती वसतीगृहात 75 पैकी 33, गोमती 75 पैकी 28 तर 500 विद्यार्थिनी क्षमता असलेल्या नर्मदा वसतीगृहात 206 विद्यार्थिनींचा प्रवेश झाला आह़े यात 203 मुली ह्या गेल्यावर्षापासून शिक्षण घेत आहेत़ याठिकाणी केवळ 2 विद्यार्थिनी नव्याने दाखल झाल्या आहेत़ कुचकामी संकेतस्थळ आणि किचकट प्रवेशप्रक्रिया यातून हा प्रकार घडला आह़े सर्व सात वसतीगृहात 1 हजार 96 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले आहेत़ यात मुलांच्या चार वसतीगृहात 606 विद्यार्थी जुने आहेत़ तर केवळ 226 विद्यार्थी नवीन आहेत़ दुसरीकडे मुलींच्या वसतीगृह प्रवेशाबाबत दयनीय स्थिती आह़े केवळ 4 नवीन विद्यार्थिनींचे प्रवेश झाले आहेत़ 262 विद्यार्थिनी ह्या गेल्या वर्षापासून प्रवेशित आहेत़ प्रवेशाबाबत अनाकलनीय धोरण राबवणा:या आदिवासी विभागाच्या धोरणामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत़ यातून दिलासा मिळण्याची शक्यताही कमी आह़े आजअखेरीस नंदुरबार शहरातील 4, कोरीट, कोठली, धानोरा, पथराई ता़ नंदुरबाऱ नवापूर शहरातील 3, खांडबारा, नागझरी, झामणझर ता़ नवापूर, शहादा शहरातील 3 अशा मुलांच्या 17 वसतीगृहात 1 हजार 484 विद्याथ्र्याचे प्रवेश आहेत़ यात 283 विद्यार्थी हे नवीन आहेत़ एकूण 2 हजार 192 मुलेच वसतीगृहात राहू शकणार आहेत़ 
प्रकल्पांतर्गत मुलींचे 12 वसतीगृह आहेत़ यात नंदुरबार शहरात 3, पथराई ता़ नंदुरबार, नवापूर शहरात 2, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा, करंजी ता़ नवापूर आणि शहादा शहरात 2 वसतीगृह आहेत़ यात 711 विद्यार्थिनींचे प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले आह़े यात 707 विद्यार्थिनी ह्या जुन्याच असून केवळ 4 मुलींचे नव्याने प्रवेश झाले आहेत़   
संकेतस्थळाबाबत सातत्याने तक्रारी करूनही आदिवासी आयुक्तालयाने दखल न घेतल्याने नवीन विद्याथ्र्याचे केवळ 2 टक्के प्रवेश झाल्याचे यातून सिद्ध होत आह़े वारंवार ‘हँग’ होणा:या संकेतस्थळामुळे एकच अर्ज किमान चारवेळा भरूनही अनेकांचे प्रवेश झालेले नव्हत़े  

Web Title: Two thousand tribal students from Nandurbar stand in Tangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.