दोन आठवड्यानंतर कार्यालयांत गजबज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:13 PM2020-04-21T12:13:03+5:302020-04-21T12:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे जाहिर केले होते़ त्यानुसार सोमवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे जाहिर केले होते़ त्यानुसार सोमवारपासून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी होती़ यात अधिकारी १०० टक्के तर कर्मचारी १० टक्के उपस्थित होते़
जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हा परिषदेसह इतर कार्यालयात याच प्रकारे कामकाज करण्यात आले़ दोन आठवड्यानंतर बरेच कर्मचारी कामावर आल्याने कार्यालयांमध्ये कामांना वेग आल्याचे दिसून आले़ यात प्रामुख्याने मनरेगाची कामे, रखडलेली बिले, वेतनाची बिले, महसूली जमा याबाबतची कामे सुरु करण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखा, प्रांताधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना यासह विविध शाखांमध्ये अधिकारी उपस्थित होते़ जिल्हा परिषदेत कृषी, पशुसंवर्धन, लघुसिंचन, शिक्षण, आरोग्य या विभागात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले़ त्यांच्याकडून दिवसभरात कामकाज पूर्ण करण्यात आले़