पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर : सावरट येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:48 AM2018-03-14T11:48:22+5:302018-03-14T11:48:22+5:30
समोरा-समोर झाली धडक, जीप चालकाविरुध्द गुन्हा
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नवापूर शहरापासून सहा किमी अंतरावर जीप व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली.
पोलीस सूत्रांनी सांगितल्यानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे एक वाहन (क्रमांक एमएच 39 ए 175) दुरुस्तीसाठी पोलीस मुख्यालयातून कारागीर घेऊन नवापूरकडे येत होत़े तर नवापूर येथील समीर गुणवंतलाल दलाल (50) व इम्रान लतीफ शेख (22) हे दोघे विनाक्रमांक असलेला युवक दुचाकीवरून नंदुरबार कडे जात होते.
सावरट गावाजवळ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली़ यात दुचाकीस्वार दोन्ही गंभीर जखमी झाले. नवापूर येथे प्राथमोपचार केल्यानंतर इम्रान शेख यांना धुळे येथे तर समीर दलाल यांना सुरत येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
जीप चालक पोलीस हवालदार सुनील जाधव यांच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक नंदुरबारकडे जात असतांना अपघात पाहुन त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली़