अट्टल घरफोड्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:42 PM2020-01-29T12:42:45+5:302020-01-29T12:42:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सराफाचे दुकान फोडून मुद्देमाल चोरी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ ...

Two-year imprisonment for unsuccessful housebreak | अट्टल घरफोड्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अट्टल घरफोड्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील सराफाचे दुकान फोडून मुद्देमाल चोरी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली़
जानेवारी २०१९ मध्ये टिळक रोडवरील श्रद्धा साई ज्वेलर्स या दुकानाचे दार तोडून चोरट्याने २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पथकाने संतोष दिलीप तिजविज यास ताब्यात घेतले होते़ त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती़ दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती व्ही़जी़चव्हाण यांनी साक्षी पुरावे तपासल्यानंतर तिजविज याच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाला होता़ यातून त्याला दोन वर्षाचा कारावास व दीड हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांनी दाखल केले़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ चंद्रकांत पाटील यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनगर व मनोज साळूंखे यांनी काम पाहिले़

Web Title: Two-year imprisonment for unsuccessful housebreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.