सोमावल जवळ पाण्याच्या टँकरवर दुचाकी धडकून दोघे युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:55 PM2018-06-13T12:55:58+5:302018-06-13T12:55:58+5:30

Two youths killed in a water tank near Somaval near here | सोमावल जवळ पाण्याच्या टँकरवर दुचाकी धडकून दोघे युवक ठार

सोमावल जवळ पाण्याच्या टँकरवर दुचाकी धडकून दोघे युवक ठार

Next

नंदुरबार : सायंकाळच्यावेळी  गाव परिसरात फेरफटका मारणा:या चौघांकडून एकाच दुचाकीवर बसून केलेली मस्ती दोघांच्या जीवावर बेतली़ ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर वेलीपाडा फाटय़ाजवळ   दुचाकी थेट टँकरवर धडकल्याने दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आह़े रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती़  
विशाल आमटय़ा पाडवी (17) हा दुचाकीने अंकुश राजू पाडवी (16) रा़ सोमावल बुद्रुक अशी मयतांची नावे आहेत़  तर सोमावल येथीलच रोहित जगदीश पाडवी व दीपक गणेश पाडवी हे दोघे जखमी झाले आहेत़  दुचाकीस्वार विशाल रविवारी सायंकाळी त्याच्या तिघा मित्रांना घेऊन दुचाकीने सोमावल गावात  फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता़ एकाच दुचाकीवर चौघे बसून अंकलेश्वर महामार्गावरून आपल्याच मस्तीत भरधाव वेगातून दुचाकीने जात असताना  वेलीपाडा फाटय़ाजवळ विशाल पाडवी याचा दुचाकीवरचा ताबा सुटला़ यातून दुचाकी थेट पाण्याच्या टँकरवर  आदळली़ यातून विशाल पाडवी आणि अंकुश पाडवी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित पाडवी आणि दीपक पाडवी हे दोघेही गंभीर जखमी झाल़े या भागातून जाणा:या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चौघांना तळोदा उपजिल्हा रूग्णालयात नेल़े तेथे दोघे मयत झाल्याचे सांगण्यात आल़े तर दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल़े 
पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर तळोदा पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहनलाल वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पाडवी रा़ सोमावल बुद्रुक याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात अपघातास तसेच स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़ 
 

Web Title: Two youths killed in a water tank near Somaval near here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.