नंदुरबारात पाईपलाईन फोडण्याचा पुन्हा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:30 PM2018-06-01T13:30:53+5:302018-06-01T13:30:53+5:30

Type of scrapping of pipeline in Nandurbar | नंदुरबारात पाईपलाईन फोडण्याचा पुन्हा प्रकार

नंदुरबारात पाईपलाईन फोडण्याचा पुन्हा प्रकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विघAसंतोषी लोकांकडून पालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्याचे प्रकार सुरूच आहे. गुरुवारी सकाळी कल्याणेश्वर मंदीराजवळ अज्ञात व्यक्तीने पाईप लाईन फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दुरूस्तीसाठी संपुर्ण दिवस लागल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार व आष्टे ते नंदुरबार अशा दोन पाईपलाईनी आहेत. विरचक प्रकल्पातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून थेट शहरातील जलकुंभामध्ये पाणी येते. तर आष्टे उद्भव क्षेत्रात आंबेबारा धरणातील पाणी आणून तेथून पंपींग करून ते पाईपाईनद्वारे आणण्यात येते. पैकी विरचकच्या पाईपलाईनला गुरुवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने खिळे मारून फोडली. कल्याणेश्वर मंदीराच्या जवळ हा प्रकार घडला. सकाळी हजारो लिटर पाणी वाया गेले. तातडीने या पाईपलाईनचा उपसा बंद करण्यात आला. त्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचणी आल्याने गुरुवारी ज्या भागात पाणी पुरवठय़ाची वेळ होती त्या भागातील वेळापत्रक कोलमडले.
दुरूस्तीसाठी पुर्ण दिवस वाया
पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी अर्थात ज्या ठिकाणी फोडली त्या ठिकाणी वेल्डींग करण्यासाठी संपुर्ण पाईपलाईन कोरडी करावी लागते. त्यानंतरच वेल्डींग केली जाते. त्यामुळे संपुर्ण दिवस लागला.
शोध घेवून कारवाई करावी
पाईन लाईन फोडण्याचा महिनाभरातील हा तिसरा प्रकार आहे. गेल्या महिन्यात धुळे चौफुलीलगत पाईपलाईन फोडण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवडय़ात नांदरखेडा फाटय़ाजवळ पाईप लाईन फोडण्यात आली होती. आता कल्याणेश्वर मंदीराजवळ पाईप लाईन फोडण्यात आली. अशा विघAसंतोषी लोकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Type of scrapping of pipeline in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.