उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:41 PM2018-03-09T12:41:26+5:302018-03-09T12:41:26+5:30

Udhna-Jalgaon II road will start from April 15 | उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. 
उधना ते जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे. केवळ उधना ते चलनाथ आणि नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यान काम बाकी होते त्यापैकी उधना ते चलथान या 11 किलोमिटरच्या दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी त्याची चाचणी घेतली गेली. ती यशस्वी देखील झाली आहे. या 11 किलोमिटरच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी ताशी 120 कि.मी.वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात आली.  संबधीत विभागाने हिरवा कंदील दिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या 11 किलोमिटरच्या अंतरात मोठय़ा प्रमाणावर रेल्वे गाडय़ांची गर्दी असते. सुरत-मुंबई रेल्वे लाईन देखील याच दरम्यान जोडली जात असल्यामुळे नंदुरबारकडून जाणा:या गाडय़ांना लवकर सिगAल मिळत नाही. आऊटरवर 10 ते 30 मिनिटे थांबावे लागते. परिणामी 11 किलोमिटरच्या अंतरासाठी तेवढा वेळ वाया        जातो. आता दुहेरीकरणानंतर ही समस्या राहणार नसल्याने तो वेळ वाचणार आहे. परिणामी नंदुरबार ते उधना किंवा सुरत हा प्रवास आता  दोन ते सव्वादोन तासांचा राहील   असा अंदाज रेल्वे सुत्रांनी व्यक्त    केला. 
यामुळे नंदुरबारहून सुरत हे सर्वात जवळचे मेट्रो शहर राहणार आहे. नाशिक येथे जाण्यासाठी बस किंवा कारने पाच ते सहा तासांचा वेळ जातो. जळगावला जाण्यासाठी देखील रेल्वेचे अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता आता सुरत हे सर्वात जवळचे शहर नंदुरबारकरांसाठी ठरणार आहे.
उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चर्पयत पुर्ण 306 किलोमिटरचे काम पुर्ण झालेले असेल. 
दरम्यान, नंदुरबार ते दोंडाईचा या 35 ते 40 किलोमिटर अंतराच्या दुहेरीकरणासाठी मार्च 2018 ही मुदत देण्यात आली आहे. गेल्याच आठवडय़ात आलेले पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार गुप्ता यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Udhna-Jalgaon II road will start from April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.