उमज माता यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:48 IST2017-12-15T13:48:11+5:302017-12-15T13:48:17+5:30

उमज माता यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक येत असतात़ यात्रोत्सवात व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली होती़
शिंदे येथील 100 वर्षापासूनचे स्वयंभू असे उमज मातेचे देवस्थान आह़े या यात्रोत्सवात परिरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील कान्याकोप:यातून भाविक मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात़ 100 वर्षापूर्वी शिंदे व खोडसगाव येथील गावक:यांची भक्ती पाहून उमज माता शिंदे खोडसगाव रस्त्यावर प्रकट झाली अशी अख्यांयीका सांगितली जात़े मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून उमज मातेला मानले जात़े
भाविकांची मनोकामना पूर्ण झाली तर मंदिर परिसरात जिवंत बोकड व कोंबडय़ा सोडण्याची येथील जूनी प्रथा आह़े यात्रेनिमित्त ग्रामस्थांकडून गाव दिवाळीचे आयोजन करण्यात येत असत़े तसेच तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असत़े या तगतरावाचे ग्रामस्थ स्वागत करुन पुजा करीत असतात़
सायंकाळी मंदिरावर लाकडी घोडे चढविण्यात आले होत़े येथे दरवर्षी ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली आह़े ते भाविक लाकडी घोडे बनवून वाजत गाजत मंदिरावर ते घोडे चढवत असतात़ शेजारीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील जलदेवता मंदिरा आह़े याठिकाणीदेखील भाविकांनी गर्दी केली होती़