अक्कलकुव्यात व्यापा:यांविरोधात अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:17 PM2017-11-01T13:17:26+5:302017-11-01T13:17:26+5:30
धान्य दर विचारल्यावरून वाद : शहरात तणावपूर्ण शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतमालाचे भाव कमी जास्त का करतात, असे विचारल्याच्या कारणावरून अक्कलकुवा येथे दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ यात एका गटाने दिलेल्या फिर्यादीवरून 50 व्यापा:यांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अक्कलकुवा शहरातील शेतमाल व्यापारी भवरलाल जैन यांच्या धान्य दुकानात जाऊन निलेश जयवंत पाडवी रा़ कडवामहू ता़ अक्कलकुवा याने सोयाबीनचे भाव कमी जास्त का करतात असा प्रश्न केला होता़ यावरून त्यांच्या वादावादी झाली़ यावेळी संशयित आरोपी भवरलाल जैन, बबलू चौधरी, नरेश मिलापचंद जैन, बबुआ मकराणा चौधरी यांच्यासह भवरलाल जैन यांची दोन मुले व इतर 50 व्यापा:यांनी निलेश पाडवी व त्याचा भाऊ समीर जयवंत पाडवी या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ या दरम्यान त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली़ संशयित सर्व व्यापा:यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत़ निलेश पाडवी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात रात्री उशिराने दिलेल्या फिर्यादीवरून सर्व संशयित 50 व्यापा:यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ करण्यासह जमावबंदीचा आदेश झुगारून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
या प्रकारानंतर अक्कलकुवा शहरात तणाव निर्माण झाला होता़ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने तणाव परिस्थिती नियंत्रणात आली़ अक्कलकुवा विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली़