डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन ट्रेंड्स समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:10 PM2019-06-02T12:10:33+5:302019-06-02T12:10:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मेडिकल सायन्सचा झाला तसा कायदा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर जैसे थे परिस्थिती राखणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मेडिकल सायन्सचा झाला तसा कायदा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर जैसे थे परिस्थिती राखणारी कायदे क्षेत्राची परंपरा आता बदलण्याची गरज आहे. यापाश्र्वभूमीवर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ट्रेंड्स समजून घेणे आवश्यक आहे. असे मत मानवाधिकार विेषक व संविधानतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
नंदुरबारात लीगल नेक्स्ट तर्फे आयोजित कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांशी संवाद कार्यक्रमात डॉ. सरोदे बोलत होते. यावेळी प्राचार्य नितीश चौधरी, अॅड. पी.एन. देशपांडे, अॅड. शारदा पवार, अॅड.कोठावाला, अॅड. राजेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. अॅड.सरोदे म्हणाले, कायद्याच्या क्षेत्रात, न्यायव्यस्थापणात सुधारणा स्विकारुन एकूणच अनेक प्रक्रियांमध्ये सुधारणा केल्यात तर विधिविषयक सेवांचा दर्जा परिणामकारकपणे उंचावला जाऊ शकतो. आता व्हच्यरुअल लॉ फर्म व कार्यालयांची कल्पना मांडली जाते आहे. या सर्व वेगवान बदलांमध्ये आम्ही सहभागी झालो नाही तर खूप मागे राहू. सायबर सेक्युरिटी, पक्षकार व वकील संबंध व्यवस्थापन, आपल्याच कामाचे मुल्यांकन, इलेक्ट्रॉनिक डिस्कव्हरी, पुरावा म्हणून कायदेशीर ग्राह्यतेचे प्रश्न या संदर्भात आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला तरच न्यायाचे क्षेत्र पुरोगामी होईल असेही अॅड. असीम सरोदे म्हणाले. मंदार लांडे यांनी सांगितले, न्यायव्यवस्था ही लोकशाहीच्या तीन स्तंभांपैकी एक आहे. न्यायव्यवस्थेने प्रभावीपणे कार्य करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. लोकशाहीचा तिसरा स्तंभ ताकदवान असेल आणि तंत्रज्ञानासह सुसज्ज
तीन हजार न्यायालये, 25 लाखपेक्षा अधीक वकील आणि पावणेचार लाख कायद्याचे विद्यार्थी 3.3 करोड प्रलंबित प्रकरणांविरुद्ध विचारात घेतल्या गेलेल्या तुलनेत अपुरे असल्याचे दिसते. कागदावर आधारित प्रणाली आणि डिजीटलिङोशन द्वारे बदल घडवून आणण्याचे प्रय} सुरू आहेत. कायदेशीर क्षेत्रातील बदल सुधारणे आणि वाढविण्याचा ई-कोर्टचे प्रय} सुरू असल्याचे सांगण्यात आले.