युनिसेफ प्रमुखांची जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:25 PM2019-07-01T12:25:08+5:302019-07-01T12:25:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युनिसेफच्या भारतातील प्रमुख डॉ.यास्मिन अली हक यांनी जिल्ह्यास भेट दिली. त्यांच्यासमवेत युनिसेफच्या क्षेत्रीय अधिकारी ...

UNICEF Heads Visit to Inaccessible Areas in District | युनिसेफ प्रमुखांची जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेटी

युनिसेफ प्रमुखांची जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : युनिसेफच्या भारतातील प्रमुख डॉ.यास्मिन अली हक यांनी जिल्ह्यास भेट दिली. त्यांच्यासमवेत युनिसेफच्या क्षेत्रीय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर आणि पोषण आहारतज्ज्ञ राजी नायर उपस्थित होत्या. या वेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी त्यांचे स्वागत करून प्रशासनातर्फे नागरिकांसाठी करण्यात येणा:या आरोग्य सुविधा व पोषण विषयक उपाययोजनांची माहिती दिली. 
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल. बावा आदी उपस्थित होते. युनिसेफद्वारा आकांक्षित जिल्ह्यातील अपेक्षित निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हक यांनी जिल्हाधिका:यांशी चर्चा केली. जिल्हास्तरीय अधिका:यांसोबत झालेल्या बैठकीत युनिसेफच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या अमृतमंथन कार्यशाळेत निश्चित करण्यात आलेल्या कृती आराखडय़ानुसार पुढील उपाययोजनांसाठी युनिसेफतर्फे सहकार्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन डॉ.हक यांनी दिले. 
जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेत शिक्षणाचा प्रसार विशेषत: मुलींच्या शिक्षणावर जास्त भर देण्यात यावा. जर मुलगी शिकली तर तिचा कमी वयात विवाह होणार नाही, सहाजिकचं विवाहाचे वय वाढेल. मुलगी शिकली तर तिच्या शारिरीक व मानसिक विकास होईल एकंदरीतचं जन्मनारी पिढी कुपोषित जन्मनार नाही. युनिसेफ व इतर संस्थांनी या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोमवंशी यांनी अमृतमंथन कार्यशाळेतील निर्देशांकावर विशेष भर देण्यात यावा, असे सांगितले. डॉ.यास्मिन अली हक यांनी धडगांव तालुक्यातील उर्मिलामाळ या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन तेथील किशोरवयीन मुली, माता आणि बालकांशी संवाद साधला. 
धडगाव येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भेट देऊन दाखल बालके आणि पालकांशी चर्चा केली. तालुकास्तरावर सुरु केलेल्या आयर्न सुक्रोज वार्डात दाखल तीव्र रक्तक्षय असणा:या महिलांशी आणि अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासोबत चर्चा करुन जिल्ह्यातील माता व बाल आरोग्यसंदर्भात चर्चा केली. 
युनिसेफ मार्फत जिल्ह्यात सन 2005 पासून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने सीमॅम प्रकल्प, स्तनपान व शिशुपोषण कार्यक्रम, पोषण पुर्नवसन केंद्र, आयएमएनसीआय क्षमता बांधणी प्रशिक्षण, बाळाचे पहिले हजार दिवस या विषयावर ग्रामस्तरावरील कर्मचा:यांचे प्रशिक्षण, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात पोषण परसबागेद्वारे हिरव्या पाल्या भाज्याचे प्रमाणात वाढ करणे इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांची डॉ.यास्मिन अली हक यांनी पाहणी केली.
 

Web Title: UNICEF Heads Visit to Inaccessible Areas in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.