शहाद्यात एड्सबाधीत जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:47 PM2018-12-02T12:47:07+5:302018-12-02T12:47:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एड्सबाधीत युवक-युवतींनी येथे आज सप्तपदी घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. निमित्त होते येथील डीवाय.एस.पी. पुंडलिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : एड्सबाधीत युवक-युवतींनी येथे आज सप्तपदी घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. निमित्त होते येथील डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे यांच्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याच्या उपक्रमाचे. गेल्या 10 वर्षापासून ते असा उपक्रम राबवीत आहेत. आजच्या या विवाह सोहळ्यात दोन एड्सबाधीत जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे, एनएमआय सेवा फाऊंडेशन, नेटवर्क नंदुरबारतर्फे शनिवारी एड्स दिनाचे औचित्य साधून एड्सबाधीत दोन जोडप्यांचा विवाह समारंभ झाला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक संजय साठे, नाना निकुम, ज्ञानेश्वर चौधरी, नगरसेविका रिमा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल भामरे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, धडगावचे पोलीस निरीक्षक संजय भामरे आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात एड्सबाधीत जोडप्यांचा पहिला सोहळा होता. प्रारंभी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शाहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले की, एड्सबाधीतांचे विवाह लावून राज्यात एक वेगळा संदेश यानिमित्त गेला आहे. हा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. एड्सग्रस्तांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रय}शील राहणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील म्हणाले की, आज आदर्श विवाह झाला असून समाजात असे विवाह खूप वेगळे स्थान राखतो. त्यातून शहीदांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. एड्स या आजाराची गंभीरता खूप असल्याचे सांगून एड्सबाधीतांच्या जीवनात फुलांकूर फुलवणा:या सपकाळे यांचे त्यांनी कौतुक केले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, एड्सबाधीतांसाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अविस्मरणीय आहे. समाजात बरेच उपक्रम राबविले जातात. मात्र खाकी वदीर्तील व्यक्ती माणुसकी जपतो हे विशेष आहे. सपकाळे यांच्यासारखी माणसे समाजात अजून निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले की, सामाजिक उपक्रमातून समाजासाठी आपण काही देणे लागतो हे साध्य करीत शहीद हेमंत करकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्सबाधीतांसाठी काम करण्याचा प्रय} केला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रातील लोकांचे यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अब्बास नुरानी, इरफान पठाण, काशीनाथ पाटील, शाम जाधव, राम जाधव, गिरीश पाटील, नासीर मिस्तरी, माजी नगरसेवक के.डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रा.लियाकत सैयद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्मचा:यांनी सहकार्य केले.