बेघरांच्या वस्तीतील झोपडीत अज्ञात वस्तूचा स्फोट; तीनजण जखमी

By मनोज शेलार | Published: January 18, 2024 08:09 PM2024-01-18T20:09:25+5:302024-01-18T20:14:34+5:30

शहरातील भोणे फाट्याजळव बेघरांनी तात्पुरती वस्ती केली आहे.

Unknown object explodes in a hut in a homeless settlement, three injured | बेघरांच्या वस्तीतील झोपडीत अज्ञात वस्तूचा स्फोट; तीनजण जखमी

बेघरांच्या वस्तीतील झोपडीत अज्ञात वस्तूचा स्फोट; तीनजण जखमी

नंदुरबार : शहरातील बेघरांच्या झोपडीत झालेल्या अज्ञात वस्तूच्या स्फोटात तीनजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. जखमींमध्ये एक महिला व दोन बालिकांचा समावेश आहे.

शहरातील भोणे फाट्याजळव बेघरांनी तात्पुरती वस्ती केली आहे. कच्च्या झोपडीमध्ये हा स्फोट झाला. संबधीत कुटूंब फुगे विक्रेते असल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत अश्विनी खोडया भोसले (वय ९ महिने) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सरीणाबाई पूनमलाल भोसले (४०) व एक दहा वर्षाची मुलगी गंभीरित्या भाजली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची दखल घेत नोंद केली असून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Web Title: Unknown object explodes in a hut in a homeless settlement, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.