यंत्रणांची बेपर्वाई अन् नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:01 PM2019-07-03T12:01:01+5:302019-07-03T12:01:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या 10-12 दिवसांपूर्वी वादळी वा:याने शहरातील तहसील कार्यालय रोडवरील जीर्ण झाड कोसळले होते. तथापि, ...

The untidiness of the system and the hassle of civilians | यंत्रणांची बेपर्वाई अन् नागरिकांना त्रास

यंत्रणांची बेपर्वाई अन् नागरिकांना त्रास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या 10-12 दिवसांपूर्वी वादळी वा:याने शहरातील तहसील कार्यालय रोडवरील जीर्ण झाड कोसळले होते. तथापि, या पडलेल्या झाडाची विल्हेवाट अजूनही संबंधित यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहदारीस अडथळा ठरत असून वाहतुकीचीही मोठी कोंडी होते. उन्मळून पडलेले हे झाड उचलण्याबाबत नगरपालिका व वनविभागाने आपआपली जबाबदारी झटकली आहे. जबाबदार वरिष्ठ महसूल प्रशासनानेही याबाबत कानावर हात ठेवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या 10-12 दिवसांपूर्वी प्रचंड वादळवारे आले होते. या वादळामुळे तळोदा शहरातील तहसील कार्यालयाकडील एका ङोरॉक्सच्या दुकानाजवळील लिंबाचे मोठे जीर्ण झाड उन्मळून दुकानावर कोसळून दुकानाचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने घटनेची तात्काळ दखल घेत प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी पाहणी केली. शिवाय दुकानाच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. साधारण एक लाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सुदैवाने महिन्यातील चौथा शनिवार होता म्हणून कार्यालय बंद होते. परिणामी ग्रामीण भागातून कार्यालयीन कामासाठी येणा:यांची गर्दी नव्हती. त्यामुळे अप्रिय घटना टळली. मात्र उन्मळून पडलेले झाड आजही तेथेच ‘जैसे थे’ आहे. ते उचलण्याबाबत कोणत्याच यंत्रणेने कार्यवाही केलेली नाही.  त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वास्तविक वादळी वा:यामुळे रस्त्यातच झाड  कोसळल्याने ते तातडीने उचलून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. असे असताना यंत्रणांनी आपआपली जबाबदारी एकमेकांवर झटकली आहे. सदर दुकानदारही हे झाड उचलून त्याची विल्हेवाट लावण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी परवान्याची पास लागते. या पाससाठी तो सातत्याने वनविभागाकडे चकरा घालत आहे. वरिष्ठांकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे मोघम उत्तर त्याला मिळत असल्याचे तो सांगतो. केवळ वनविभागाच्या परवान्याअभावी हे झाड उचलता येत नसल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: The untidiness of the system and the hassle of civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.