मास्क न लावणा:या तरुणींची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:44 PM2020-04-18T12:44:30+5:302020-04-18T12:44:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तात्पुरत्या भाजी मार्केटमध्ये विक्री करणा:या विक्रेत्यांनी व खरेदी करायला येणा:या नागरिकांनी आपल्या चेह:यावर मास्क ...

Unwearing Mask: The Youth of the Youth | मास्क न लावणा:या तरुणींची अरेरावी

मास्क न लावणा:या तरुणींची अरेरावी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तात्पुरत्या भाजी मार्केटमध्ये विक्री करणा:या विक्रेत्यांनी व खरेदी करायला येणा:या नागरिकांनी आपल्या चेह:यावर मास्क लावा, अशी सूचना मुख्याधिकारी व पालिकेचे कर्मचारी करत असताना त्यांच्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका युवकासह दोन युवतींविरोधात  शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या वेळी जोरदार शाब्दीक चकमक झाल्याने परिसरात मोठा जमाव जमला होता.
 कोरोना विषाणू संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व कर्मचारी अन्नपूर्णा लॉजशेजारील तात्पुरत्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहणीसाठी गेले असता तेथे काही विक्रेते व नागरिकांनी चेह:यावर मास्क लावले नव्हते.  यादरम्यान दोन युवतींनी मुख्याधिका:यांशी अचानक वाद घातला. दोन्ही बाजूने मोठी शाब्दिक चकमक उडाल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. संबंधित युवतीने फोन करून आपल्या भावाला व नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले होते. यामुळे प्रकरण हातघाईवर आले होते. याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व कर्मचा:यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले.
शहादा पोलिसात पालिकेचे कर्मचारी वसीम रफिक शेख यांच्या फिर्यादीवरून भरत प्रकाश चित्रकथे व दोन युवती अशा तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणला, साथरोग नियंत्रण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करीत आहेत.
दरम्यान, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत प्रशासनातर्फे नागरिकांना संचारबंदीत शिथीलता देण्यात आली असली तरी याचा गैरफायदा काही हुल्लडबाज नागरिकांकडून घेतला जात असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. त्यातच मास्क लावल्याशिवाय नागरिकांनी शहरात येऊ नये, अशा सूचना वारंवार पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी याचे सर्रासपणे उल्लंघन शहरातील काही नागरिकांकडून होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Unwearing Mask: The Youth of the Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.