तपासणीनंतर दारूचा ट्रक सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:34 PM2019-10-09T12:34:48+5:302019-10-09T12:34:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने तळोदा येथे मद्य वाहून नेणारा ट्रक ताब्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने तळोदा येथे मद्य वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेतला होता़ सुमारे तीन ते चार तास कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ट्रक सोडून दिला होता़
सोमवारी सकाळी 10़30 वाजता मेवासी वनविभाग तपासणी नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एमएच 18-एम-9887 या वाहनात 9 लाख 66 हजार 680 रुपयांचा मद्यसाठा भरारी पथकाला आढळून आला होता़ दरम्यान पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिली असता, त्यांनी तातडीने येथे भेट दिली़ हा ट्रक धुळे येथून खापर येथे मद्य घेऊन जात असल्याचे सांगण्यात आल़े कागदपत्रे पडताळणीनंतर वाहन खापर येथील एम़एम़चौधरी यांच्याकडे जात असल्याचे सांगण्यात आल़े या प्रकारामुळे मात्र हा विषय चर्चेचा ठरला.