सातपुडय़ातील जहाज म्हणून गाढवांचा होतोय उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:09 PM2019-06-02T12:09:12+5:302019-06-02T12:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या द:याखो:यात जेथे रस्ते नाहीत अशा ठिकाणी पुन्हा पूर्वीसारखाच गाढवांचा वापर होऊ लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या द:याखो:यात जेथे रस्ते नाहीत अशा ठिकाणी पुन्हा पूर्वीसारखाच गाढवांचा वापर होऊ लागला आहे. वाळवंटातील जहाज जसे उंट ओळखला जातो तसे आता सातपुडय़ातील जहाज ‘गाढव’ ओळख निर्माण करू लागले आहे.
सातपुडय़ाच्या द:याखो:यात दळणवळणाचे साधन पोहचल्याचा डांगोरा पिटला जातो. परंतु आजही अनेक गावे व पाडे असे आहेत तेथे जाण्यासाठी धड पायवाट नाही. अशा ठिकाणी सामान नेण्यासाठी गाढवांचाच वापर करावा लागतो. मध्यंतरी गाढवांऐवजी छोटे घोडे किंवा खेचर याचा वापर केला जात होता. परंतु वजन वाहून नेण्यात घोडे किंवा खेचर पेक्षा गाढव अधीक मजबूत असल्यामुळे आता पुन्हा गाढवांना मागणी वाढू लागली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या मालीआंबापाडासह तामणाई मालपाडा, डोणापाणी, ईराईपाडा, केडापाडा या दोन ते अडीच किलोमीटर वरील गावांसह व पाच किलोमीटरवरील ईराईपाडा येथे जाण्याकरीता रस्ताच नसल्याने संसारोपयोगी साहीत्य डोक्यावर न्यावे लागत आहे. घरकूल योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील गाढवावरून न्यावे लागत आहे. मोलगीच्या मुख्य रस्त्यावरील ठिकाणावरून डोंगरावरील नागमोडय़ा पायवाटेने नदी पार करीत रेती, कपची व विटा आदी साहीत्य न्यावे लागते.
सातपुडय़ाच्या घाटातील मोलगी मार्गावर पाण्याच्या ङिारा म्हणून ओळख असलेल्या ठिकाणाहून डाबच्या मालीआंबापाडासह तामणाई मालपाडा, डोणापाणी, ईराईपाडा, केडापाडा या दोन ते अडीच किलोमीटर व पाच किलोमीटरवरील ईराईपाडा येथे जाण्यासाठी रस्ताच नाही. येथील नागरिकांना संसारोपयोगी साहीत्य डोक्यावर घेवून मोलगीच्या मुख्य रस्त्यापासून तर डोंगराच्या नागमोडय़ा पायवाटेने नदीच्या पलीकडे पुुन्हा डोंगर चढत जावे लागत असते. सद्या घरकुल लाभाथ्र्याच्या घराचे कामे सुरू असल्याने घर बांधकामासाठी लागणारे रेती, विटा, सिमेंट आदी साहित्यांची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा आधार घ्यावा लागत आहे.
रांगतील अनेक तीव्र चढाव किंवा उताराच्या ठिकाणी वस्ती करून वास्तव्य केले जाते. अशा ठिकाणी रस्ता करणे म्हणजे मोठे दिव्य असते. त्यामुळे अद्यापही पायवाटेचाच वापर या भागात केला जातो. जर जड साहित्य वाहून न्यायची वेळ आली तर मोठी कसरत असते. त्यामुळे सातपुडय़ात गाढवांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर केला जातो.