एटीएमद्वारे फसवणूक करणारी उत्तर प्रदेशची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:58 AM2018-02-15T11:58:25+5:302018-02-15T11:58:32+5:30

Uttar Pradesh gang raided by ATMs | एटीएमद्वारे फसवणूक करणारी उत्तर प्रदेशची टोळी जेरबंद

एटीएमद्वारे फसवणूक करणारी उत्तर प्रदेशची टोळी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एटीएमकार्ड फसवणुकीद्वारे स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणा:या उत्तर प्रदेशच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सैय्यदखान कमालउद्दीन खान (27), तौफीकखान सनाफ मुस्तकीनखान (25) रा.सगरा सुंदरपुरा, जि.प्रतापगड, ओमप्रकाश मनिराम जयस्वारल (21) रा.कोठार मंगलेपूर, जि.प्रतापगड (उत्तरप्रदेश) यांचा संशयीत आरोपींमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात तसेच जळगाव, भुसावळ, धुळे, शिरपूर, मुंबई या परिसरात या टोळीने कारनामे केले आहेत. या टोळीतील सदस्य एटीएम मध्ये पैसे काढणा:या लोकांच्या मागे उभे राहून पासवर्ड जाणून घेत असे. त्यानंतर घाईगर्दीत पैसे काढायचे असल्याचे सांगून एटीएमचा डाटा त्यांच्याकडील दुस:या एटीएम कार्डमध्ये स्कॅन करून बनावट कार्ड तयार करीत असे. त्याद्वारे आणि पासवर्डद्वारे ठिकठिकाणाहून पैसे काढून किंवा दुस:या खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक करीत होते.
स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर सोन्याबापू नवले यांनी या पद्धतीने एटीएम फसवणूक करणा:या गुन्हेगारांबाबत गोपनीय माहिती काढली. त्यानुसार सैय्यदखान कमालउद्दीनखान, तौफीक खान सनाफ मुस्तकीनखान, ओमप्रकाश मनिराम जयस्वाल यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केल असता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कबुली दिली. या टोळीकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, हवालदार दिपक गोरे, रवी पाडवी, योगेश सोनवणे, भटू धनगर, संदीप लांडगे, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सोनवणे, गोपाल चौधरी, तुषार पाटील, किरण मोरे, किरण पावरा, अभय राजपूत, पंकज महाले यांनी केली.

Web Title: Uttar Pradesh gang raided by ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.