लसीकरणारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:19 PM2021-01-17T12:19:16+5:302021-01-17T12:19:41+5:30

लसीकरणाचा शुभारंभ : जिल्ह्यातील १० हजार ८५७ कोरोना योद्ध्यांना मिळणार मोफत लस, आता मंगळवारी मोहिम जिल्ह्यात कोरोना लसिकरणाला शनिवार, १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. एकाच वेळी चार केंद्रांवर ही मोहिम सुरू करण्यात आली. औपचौरिक शुभारंभ जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर करण्यात आला. यावेळी पालकमंत्री के.सी.पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणानंतर कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. असे असले तरी दिवसभर संबधीत केंद्रांवर आवश्यक त्या उपायोजना आणि रुग्णवाहिका तैणात करण्यात आल्या होत्या.

Vaccination | लसीकरणारंभ

लसीकरणारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी नीलिमा वळवी यांनी पहिली लस घेतली.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी बोलता पालकमंत्री पाडवी म्हणाले, देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे.
लसीकरणाच्या साहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  
असे आहेत डोस...
जिल्हा रुग्णालयासह    अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही    लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रांवर  १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे ७५ कुप्या (७५० डोस), म्हसावद १७० (१७०० डोस), नवापूर ८५ (८५० डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या १२० कुप्या (१,२०० डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.

 लसीकरणानंतर रिॲक्शन नाही...

लसीकरणानंतर जिल्ह्यात कुणालाही रिॲक्शन आली नाही. दिवसभरात २६५ जणांना लस देण्यात आली. सुरुवातीला अनेकांचा मनात भिती होती. त्यामुळे स्वत: अधिकारी यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन लस टोचून घेतली.  रिॲक्शन आल्यास जिल्हा रुग्णालयात त्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्थानिक स्तरावर प्रथोमचार करून लागलीच रुग्णवाहिकेद्वारा जिल्हा रुग्णालयात त्यांना आणण्याची सुविधा आहे. 

पहिल्या लसीचा मान मिळाल्याने आनंद आहे. लोकांनी लस बाबत भिती बाळगू नये. नोंदणी केलेल्या प्रत्येकाने ती घ्यावी. मोठ्या मेहनतीने शास्त्रज्ञांनी ती घेतली आहे. -आर.डी.भोये, 
जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.