साडेतीन हजार बालकांसह गरोदर महिलांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:21 PM2019-12-03T12:21:15+5:302019-12-03T12:21:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य ...

Vaccination of pregnant women with three and a half thousand children | साडेतीन हजार बालकांसह गरोदर महिलांना लसीकरण

साडेतीन हजार बालकांसह गरोदर महिलांना लसीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जे.आर. तडवी, पंचायत समितीचे डॉ. मंगला डाडर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील तीन हजार 687 बालके व 618 गरोदर माता आहेत. यांच्या लसीकरणासाठी 2 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत तसेच 3 फेब्रूवारी ते 2 मार्च तारखांपासून  पुढील सात  दिवस ही मोहिम राहणार आहे. या कालावधीत अंगणवाडी सेविका व आशा यांच्यामार्फत सव्र्हेक्षण करुन मोहिम राबविण्यात येणार आहे. 
या चार महिन्यात होणा:या  मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत   जिल्ह्यातील सर्व शुन्य ते दोन वयोगटातील बालके व गरोदर मातांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी केले आहे.    
 

Web Title: Vaccination of pregnant women with three and a half thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.