वाल्हेरी व कुंडलेश्वर विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:34 PM2018-01-01T12:34:22+5:302018-01-01T12:34:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : निसर्ग सौदर्य अन् सफरीसाठी पर्यटकांना सतत साद घालणा:या तालुक्यातील कुण्डलेश्वर व वाल्हेरी येथील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत शासनाने उदासीन धोरण घेतले असून, या प्रकरणी राज्याचे पर्यटनमंत्री असलेले जिल्ह्याचे पालक मंत्र्यांनी तरी लक्ष घालून निधी उपलब्ध करुण द्यावा अशी पर्यटकांची माफक अपेक्षा आहे.
तळोदा शहरापासून अवघे 16 कि.मी. अंतरावर सातपुडय़ाच्या पायथ्यालगत कुण्डलेश्वर व वाल्हेरी ही तालुक्यातील दोन प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथे सातपुडय़ाची विपूल वन संपत्ती लाभली असल्याने ही स्थळे निसर्गाच्या सानिध्यात आहेत. साहजिकच येथे जिल्ह्याबरोबर जिल्हाबाहेरील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी नेहमीच येत असतात.
कुण्डलेश्वरला प्राचीन महादेवाचे मंदीर आहे. त्यामुळे येथे नेहमी भाविक दर्शना करीता येतात. याशिवाय गरम पाण्याचे दोन कुंड देखील आहेत. या पाण्यात स्नान केल्याने त्वचा रोग बारा होतो, अशी धारणा असल्याने पर्यटक बाराही महीने गर्दी करतात. मात्र येथे रस्त्या सारखी पायभूत सुविधा नसल्याने पर्यटकना अनेक अडचणीना सामना करावा लागत असतो. इच्छागव्हानपासून तेथे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण खडी उखाडल्यामुळे चालने ही मुश्किल होते. है स्थळ तळोदा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने वनविभाने तेथे विश्राम गृह उभारले आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी पेवर ब्लॉकच्या सहाय्याने रस्ते तयार केले आहे. काही स्पॉटवरील हे ब्लॉक उखडून तेथील भराव खचला आहे. त्यामुळे हे स्पॉट अत्यंत धोकेदायक बनले आहे. तेथे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येणार नाही. याकडे वन विभागाने सुध्दा दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
वास्तविक कुण्डलेश्वरला निसर्ग दत्त देणगी लाभली आहे. वन औषधींची विपुल संपत्ती येथे आहे. साहजिकच मोठे निसर्ग स्थळास वाव आहे. मात्र लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रनेने विकासाबाबत उदासीन धोरण घेतले आहे. विशेष म्हणजे येथे कुण्डलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. त्यामुळे येथे मकर संक्रातीला मोठी यात्रा भरते.
यात्रेच्या दृष्टीने सुध्दा भाविकाना साध्या किरकोल सुविधा नाहीत. एवढेच नव्हे तर जेव्हा गरम पाण्याच्या कुंदात भाविक स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी प्रसाधन गृहात जातात तेव्हा अडचणी येतात. कारण या गृहांची पूर्ण भिंती पडल्या आहेत. त्याची दुरुस्ती होत नाही. पलीकडे जाण्यासाठी केटीवेअर बंधारा बांधला आहे. त्याच्याही पाटय़ा निघाल्या आहेत. त्यादेखील बसविल्या जात नसल्याचे चित्र आहे. एकूणच कुण्डलेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सातत्याने मागणी होत असतांना सर्वानीच याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. निदान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचाकडे पर्यटन मंत्रालय आहे. त्यांनी तरी याकडे गांभीर्याने लक्ष घाण्याची मागणी आहे.