मलगाव येथे वनपालास बेदम मारहाण
By Admin | Published: June 22, 2017 01:01 PM2017-06-22T13:01:36+5:302017-06-22T13:01:36+5:30
लाकूड तोडीला मज्जाव केल्याने हल्ला
ऑनलाईन लोकमत
मंदाणे,दि.22 - शहादा तालुक्यातील मलगाव येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणा:यांना मज्जाव करणा:या वनपालाला तिघांनी कु:हाडीच्या दांडा व काठीच्या सहाय्याने मारहाण केल्याची घटना घडली़ मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
मंदाणे वनउपविभागांतर्गत मलगाव वनक्षेत्राचा समावेश आह़े याठिकाणी वनपाल म्हणून विक्रम तुळशीराम पदमोर हे कार्यरत आहेत़ मंगळवारी साडेदहा ते 11 वाजेच्या सुमारास पदमोर हे मलगाव वनरक्षक सुभाष मुकाडे, मानमोडे वनरक्षक इलान गावीत यांच्यासह वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 601 मध्ये गस्तीवर असताना चार ते पाच जण झाडे तोडत असल्याचे त्यांना दिसून आल़े त्यावेळी वनपाल पदमोर यांनी झाडे तोडू नका असे सांगून झाडे तोडण्यास मज्जाव केला़ याचा राग आल्याने सुकलाल आत्या सुळे, संजय सुकलाल सुळे, अजरुन सुकलाल सुळे सर्व रा़ मलगाव यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी पदमोर यांनी आरडोओरड केल्याने इतर दोघे वनरक्षकांनी त्यांना तिघांच्या तावडीतून सोडवल़े पदमोर यांच्यावर कु:हाडीच्या दांडय़ाने हल्ला करण्यात आल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनरक्षक पी़पी़ सूर्यवंशी, वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली़ उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांनीही माहिती जाणून घेतली याबाबत विक्रम पदमोर यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े