अस्तंभा येथे वनभाजी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:10 PM2018-09-21T13:10:10+5:302018-09-21T13:10:14+5:30

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : याहामोगी आदिवासी विकास संस्था व दिव्या महिला ग्रामसंघाचा उपक्रम

Vanbhaji Melawa at the Stomb | अस्तंभा येथे वनभाजी मेळावा

अस्तंभा येथे वनभाजी मेळावा

Next

नंदुरबार : सातपुडय़ातील अस्तंभा येथे याहामोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव व दिव्या महिला ग्रामसंघ अस्तंभा यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी मेळावा घेण्यात आला.
प्रारंभी देवमोगरा माता व वनभाजी टोपलीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी बचत गटातील महिला पारंपरिक पद्धतीने बांबूच्या टोपलीत पांढ:या रूमालात रानभाजी-वनभाजी  गुंडाळून डोक्यावर रानभाजी व वनभाजी लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दीपक अहिरे यांनी रानभाज्या व वनभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म, सुगंधी द्रव्ये, जीवनसत्व, क्षार, लोह, कॅल्शीयम असल्याचे सांगितले. या भाज्यांचा आदिवासी समाजातील नवीन पिढीने अभ्यास करून त्यांचा हंगाम कोणता, कंदमुळे व बियाण्यांचे संकलन करून कृषी महाविद्यालयात परीक्षणास आणल्यास त्यांचे जतन व संवर्धन करून  उत्पादन वाढीसाठी आणि त्यांना सुकवून मूल्यवर्धनासाठी प्रय} करता येईल, असे सांगितले.
वनभाज्यांचे प्रवर्तक रामसिंग वळवी यांनी या भाज्या परत खाण्यासाठी वापरल्या तर आपली आर्थिक बचत होईल व कुपोषण कमी होण्यास मदत होईल. या भाज्या शहरात विक्रीसाठी प्रय}पूर्वक आणाव्यात व असे मेळावे सातपुडय़ात सर्वत्र भरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नंदुरबारचे सहायक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी महिलांचा सहभाग व विविध प्रकारच्या भाज्यांची पाककला पाहून फारच आनंद झाल्याचे सांगितले. तसेच व्यवस्थापनांतर्गत अशा प्रकारच्या उपक्रमास पाठिंबा दिला जाईल व रोजगार वाढीसाठी आणि जंगल वाढीसाठी सर्वानी सहकार्य करावे. जंगल वाढले तर आणखी वेगवेगळ्या हंगामात येणा:या भाज्या, फळे खाण्यास मिळतील. तसेच आदिवासींच्या या पाककलेचे शहरातील लोकांनी अनुकरण           करावे, असे आहे. शहरात मसालेदार पदार्थ व तेल यामुळे विविध  आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले.
शहादा येथील सहायक उपवनसंरक्षक एस.आर. चौधरी यांनी आदिवासी आणि जंगल वेगळे करू शकत नाही. सातपुडय़ातील सर्वात उंच असे अस्तंभा शिखराचे महत्त्व सांगून 55 ते 60 प्रकारच्या वनभाज्या येथे असल्याचे सांगितले. काही भाज्या पावसाळ्यात उगवतात, काही हिवाळ्यात व काही नदीच्या पाण्यात तर काही झाडांवर येतात. त्यामुळे अस्तंभा येथे वनभाज्यांचा खजिना असून, या भाज्यांची अनोखी चव  आहे. या भाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी व बचत गटाच्या महिलांनी प्रयत्न करावे. अस्तंभा यात्रेदरम्यान या भाज्यांचे कॅन्टीन चालविण्याचा प्रय} करावा. म्हणजे या भाज्यांची मागणी वाढेल व शहरार्पयत याचा प्रचार होईल. भविष्यात ग्रामस्थांनी अस्तंभा डोंगर वनभाजी व जंगलाने सजविण्यास वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी अक्राणीचे आर.एफ.ओ. एच.बी. धनगर, बिलगावचे र}पारखी, काकर्दाचे पिंगळे, असलीचे वनपाल लक्ष्मण भोई, नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.व्ही.एस. पाटील, प्रा.आर.एस. बागुल, प्रा.आर.एस. बागुल, राहुल राजपूत आदी उपस्थित होते.
मेळाव्यासाठी वंदना पावरा,  रंजना नवेज, विठ्ठल कदम, छगन वसावे, मंगेश नवेज, कविता वसावे, रूषा पाडवी, पार्वती वळवी,                मीना वळवी, सरपंच पोपट वसावे, पोलीस पाटील धिरसिंग वळवी,             रिना वळवी, माधव वळवी,              वनसिंग वळवी, दिव्या महिला ग्राम संघाच्या महिलांनी परिश्रम घेतले. या वेळी राणीकाजल अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Vanbhaji Melawa at the Stomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.