वाघर्डे येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:04 PM2017-11-22T12:04:27+5:302017-11-22T12:04:40+5:30
ल कमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा विहिरी व कुपनलिकांना फायदा होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.शहादा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामाजिक संस्था व लोकसहभागातून नदी-नाले नांगरटी, गाळ काढणे आदी कामे झाल्याने पाणी अडविले जाऊन जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.सखाराम मोते यांनी ओझर्टा येथील तरुण व ग्रामस्थांच्या सहकार्याने वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये रेती भरून हा बंधारा तयार करण्यात आला आहे. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा ओझर्टा, जाम, वाघर्डे, चिखली, भोरटेक आदी गावांना फायदा होणार आहे. या पाण्यामुळे विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.