वनजमिनीच्या वादातून वालंबा येथे दोघांना मारहाण
By admin | Published: July 5, 2017 12:18 PM2017-07-05T12:18:56+5:302017-07-05T12:18:56+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे वनजमिनीच्या वादातून आठ जणांनी एकास बेदम मारहाण केली़
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.5-अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे वनजमिनीच्या वादातून आठ जणांनी एकास बेदम मारहाण केली़ ही घटना 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती़
वालंबा येथील नवसिंग खाजल्या राऊत यांचे नातलग टेमल्या मंगा राऊत यांच्या नावे वालंबा शिवारात वनजमीन पट्टा आह़े तसे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आह़े असे असतानाही धिरसिंग रामा वसावे, ना:या चांद्या वसावे, राज्या धर्मा वसावे, रमेश चांद्या वसावे, दाज्या ङिांगा वसावे, राज्या वसावे, ङिांगा बोंडू वसावे, आमद्या चांद्या वसावे सर्व रा़ सरीचा खालचापाडा यांनी नवसिंग राऊत व टेमल्या राऊत यांना लाकडी डेंगारा, लाकडी काठय़ा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली़ या वेळी हारशी टेप्या राऊत, भिकन टेप्या राऊत, सिवा राऊत यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवल्याने पुढील अनुचित प्रकार टळला़
याबाबत नवसिंग राऊत यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आठ संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दरम्यान, मोलगी पोलीस ठाण्यात दुस:या गटाकडून 2 जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आह़े