अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार तालुक्यात स्वच्छतेसाठीचे विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:03+5:302021-09-26T04:33:03+5:30

भारताच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने हागणदारीमुक्त गाव अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा परिषद, एनएसई फाऊंडेशन, फिनिश सोसायटी आणि ...

Various activities for cleanliness in Nandurbar taluka on the occasion of Amrut Mahotsav | अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार तालुक्यात स्वच्छतेसाठीचे विविध उपक्रम

अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार तालुक्यात स्वच्छतेसाठीचे विविध उपक्रम

Next

भारताच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने हागणदारीमुक्त गाव अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा परिषद, एनएसई फाऊंडेशन, फिनिश सोसायटी आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भालेर, नगाव आणि तिसी या जिल्हा परिषद शाळा व भालेर येथील क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात स्वच्छता शपथ, चित्रकला स्पर्धा, शौचालय संगीत खुर्ची अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात माझे गाव स्वच्छ गाव, माझे कुटुंब आणि कोरोना, पाणी बचत या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच स्वच्छता आणि पाण्याचा अपव्यय, कोरोना या अनुषंगाने घोषवाक्य लेखन करण्यात आले. यावेळी तीसी येथे अंगणवाडी सेविका प्रिया पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. उपक्रमात १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पंकज वानखेडे, प्रमिला देसले, माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर, मंगेश निकम, किशोरी ठकार, निलेश पगारे, दारासिंग पावरा, वैभव खांडवी, राकेश गुरव, सुनीता भोये, मारोती चिमनकर, नितीन महानुभाव, विजय गावीत यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Various activities for cleanliness in Nandurbar taluka on the occasion of Amrut Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.