राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत जीवन नगर येथे विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:38+5:302021-09-26T04:32:38+5:30
पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू, गरोदर मातामृत्यू कमी करणे ...
पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू, गरोदर मातामृत्यू कमी करणे तसेच सुदृढ सृजनशील समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पोषण आहाराची रॅली काढून विविध पोषण साहित्य रॅलीत समाविष्ट करून वाजत-गाजत आदिवासी रुढी-परंपरांच्या वाद्यासोबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी किशोरवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर यांच्यामार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये उपोषण हा केंद्रबिंदू मानून रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यासाठी पोषण आहार प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले होते. चिनोदा बीट पर्यवेक्षिका ललिता खर्डे, आशा भोई, अंजना वळवी, कल्पना पाकळे, मंगला वसावे, मीरा मिस्तरी या पर्यवेक्षकांनी मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविका गुलशन कृष्णा पावरा, कविता सुभाष वसावे व चिनोदा बीट अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती निशा पावरा, ज्योती पावरा यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी जीवन नगर येथील ज्येष्ठ नागरिक वेलजी पावरा, जोधा पावरा, दिलीप पावरा, देसऱ्या पावरा, जोरदार पाटील, भिका पावरा, सुक्राम पावरा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात परिसरातील किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांनी सहभाग नोंदवला. यानिमित्ताने पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यात महिला बाल विकास विभाग यशस्वी होत आहे, असे ललिता खर्डे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.