युवा दिनानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:00+5:302021-01-16T04:36:00+5:30
युवक-युवतींना मार्गदर्शन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युवा रंग ...
युवक-युवतींना मार्गदर्शन
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युवा रंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नंदुरबार पालिकेचे सहायक संचालक बळवंत गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक युवराज भामरे, युवा रंग फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे, सचिव राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार, सदस्य ऋषीकेश मंडलिक, शुभम पाटील, योगिता भोई उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक कळमकर, बळवंत गायकवाड यांनी युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करून स्वत:चे अनुभवकथन केले. सूत्रसंचालन जितेंद्र लुळे यांनी, तर आभार राहुल शिंदे यांनी मानले.
वळवी महाविद्यालय, धडगाव
धडगाव येथील महाराज ज.पो. वळवी कला, वाणिज्य व श्री. वि.कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा.डाॅ. एस.आर. महाले यांनी मनोगत व्यक्त केले. माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.डाॅ. मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमास माझी वसुंधरा या उपक्रमाचे धडगाव नगरपंचायत समन्वयक गिरीश मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
शिरीषकुमार मित्र मंडळ, नंदुरबार
नंदुरबार शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चिमुकल्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस चैताली हिरणवाळे या विद्यार्थिनीने पुष्प अर्पण केले, तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस ॲड. सुशील गवळी यांनी पुष्पहार अर्पण केले. सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमास प्रा.डॉ. सुनील कुवर, सुमानसिंग राजपूत, मंडळाचे सदस्य विशाल हिरणवाळे, तेजस घटी, साहूल कुशवाह आदी उपस्थित होते.