अक्कलकुवा येथील जामिया महाविद्यालयात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:23 PM2018-02-22T13:23:45+5:302018-02-22T13:23:51+5:30

उपक्रम : विद्याथ्र्याकडून विविध उपकरणांचे सादरीकरण

Various competitions at Jamia College of Akkalkuwa | अक्कलकुवा येथील जामिया महाविद्यालयात विविध स्पर्धा

अक्कलकुवा येथील जामिया महाविद्यालयात विविध स्पर्धा

Next


ऑनलाईन लोकमत
अक्कलकुवा, दि़ 22 : अक्कलकुवा येथील जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात ह्यनॅशनल लेव्हल टेकिअकल फेस्ट कनेक्ट 2018ह्ण चे आयोजन करण्यात आले होत़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुजेफा वस्तानवी होत़े
सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक के.जी. पवार यांच्या हस्ते करण्यात आल़े प्रमुख पाहुणे म्हणून ह्यएसबीआयह्ण अक्कलकुवा शाखेचे व्यवथापक निलकंठ वानखेडे, सहाय्यक शाखा व्यवथापक हरीश पाडवी, जामिया शिक्षणसंस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी अखलाक शेख, जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अकबर पटेल, लायन्स क्लबचे शाखाध्यक्ष कुशल जैन, जामिया पॉलिटेक्निक विद्यालयाचे प्राचार्य साजिद शेख, उपप्राचार्य शैय्यद इरफान, रजिस्ट्रार शैय्यद इम्तियाज उपस्थित होत़े
जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात ह्यनॅशनल लेव्हल टेकिअकल फेस्ट कनेक्ट 2018ह्ण कार्यक्रमाचे औचित्य साधत भारतातून 45 महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता या प्रसंगी साधारनत: पाच हजार विद्याथ्र्यानी कार्यक्रमाला भेटी दिल्याचे सांगण्यात आल़े यात, रोबो वार, कॅडवार, ल्याम गेम ईन, कोड डी बगिंग, बॉक्स क्रिकेट, जंक मानिया, बाईक मानिया, पेपर प्रेङोंटेशन, पोष्टर प्रेङोंटेशन, मोक इंटरव्ह्यू, असे 21 प्रकारच्या विषयावर स्पर्धा राबविण्यात आली़ कार्यक्रमाचे प्रस्ताविक जोया जुबेर यांनी केल़े सूत्रसंचालन स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. रफत खान यांनी तर आभार जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात उपप्राचार्य शैय्यद इरफान यांनी मानले.

Web Title: Various competitions at Jamia College of Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.