जलदिनानिमित्त जल दौडसह विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:10 PM2019-03-23T12:10:50+5:302019-03-23T12:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. जलसाक्षरता सप्ताहाचा जलदौडने समारोप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
पंचायत समिती सभागृहात आयोजित जलजागृती सप्ताहाच्या समारोप उपक्रमात ते बोलत होते. त्यापूर्वी जलदौड काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, देवेंद्र जोशी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, पाणी हा महत्वाचा घटक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाबाबत सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि लोकजागृतीला महत्व दिले पाहिजे. जलबचतीचा संदेश जनतेर्पयत पोहोचवून अधिकाधिक परिवर्तनावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विनय गौडा यांनी सांगितले, दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाण्यासाठीच्या संघर्षात वाढ होत आहे. पाण्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे पाणी बचतीचे महत्व प्रत्येकाने जाणावे आणि त्यादृष्टीने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
प्रास्ताविक देवेंद्र जोशी यांनी केले. सकाळी जलजागृती दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी व सर्व अधिका:यांनी त्यात सहभाग घेतला.