पोळ्याच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:16 PM2019-08-30T12:16:52+5:302019-08-30T12:16:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : पोळा सणानिमित्ताने आपापल्या सर्जा राज्याला सजविण्यासाठी शेतक:यांमध्ये उत्साह संचारला असून, विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात ...

Various events on the eve of the hive | पोळ्याच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम

पोळ्याच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : पोळा सणानिमित्ताने आपापल्या सर्जा राज्याला सजविण्यासाठी शेतक:यांमध्ये उत्साह संचारला असून, विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
यंदा रांझणीसह परिसरातील रोझवा येथे पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामात उत्पन्न चांगला येण्याचा अंदाज असून, शेतकरी सुखावला आहे. यामुळे पोळ्यानिमित्त आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शेक:यांकडून बैलांसाठी गळ्यातील सूत व इतर वस्तूंपासून तयार करण्यात आलेली माळ, पायातील घुंगरू, शिंगांना लावण्यासाठी रंग, गेरू इत्यादी वस्तु खरेदी करण्यात आल्या आहे.
यंदा नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने पोळ्याच्या दिवशी पहाटे नदी-नाल्यांवर आपापली बैले धुण्यासाठी गर्दी होणार आहे. गेल्यावर्षी शेतक:यांना पाणीटंचाईमुळे खूप कटू अनुभव आला होता. दरम्यान यंत्राच्या सहाय्याने शेती मोठय़ा प्रमाणावर होत असली तरी रोझवा पुनर्वसन वरपाडा, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन या भागात मोठय़ा प्रमाणावर बैलजोडय़ा शेतक:यांकडून ठेवण्यात येतात तर रांझणी प्रतापपूर, चिनोदा परिसरातही ब:याच बैलजोडय़ा असल्याने पोळ्याविषयी विशेष उत्साह आहे.

विसरवाडी
विसरवाडी, ता.नवापूर येथील बाजार पेठेत पोळा सणाच्या पाश्र्वभूमिवर बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतक:यांनी गर्दी केली होती. या वेळी आपला सर्जा राजा सर्वाधिक सुंदर दिसावा यासाठी शेतक:यांनी नाथ, गोंडा, मोरखीसह विविध साहित्याची खरेदी केली. 

महेंद्रा पब्लिक स्कूल, नंदुरबार
नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलतर्फे पयरुषण पर्व व पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होणा:या बैलपोळ्यानिमित्त बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूवारी बैल पोळ्याच्या पाश्र्वभूमिवर चौपाळे, ता.नंदुरबार येथील अरिहंत गोशाळेला विद्याथ्र्यानी भेट दिली. या वेळी गोशाळेतील गायींसाठी विद्याथ्र्यानी घरून आणलेला नैवद्य खाऊ घातला. यानंतर विद्याथ्र्यानी बैलगाडीतून फेरफटका मारून पोळा सणाचा आनंद साजरा केला. कार्यक्रमासाठी प्राचार्या पीनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचा:यांनी परिश्रम  घेतले.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यामुळे ज्यांच्याकडे शेतीनाही अशा ग्रामस्थांकडून गावातील कुंभाराकडून मातीचे बैल आणले जात असून, पोळा सण साजरा केला जाणार आहे.

Web Title: Various events on the eve of the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.