मंत्री सावंत यांच्यासमोर विविध संघटनांनी मांडले गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:45 PM2018-02-21T12:45:57+5:302018-02-21T12:46:09+5:30

Various organizations organized before minister Sawant | मंत्री सावंत यांच्यासमोर विविध संघटनांनी मांडले गा-हाणे

मंत्री सावंत यांच्यासमोर विविध संघटनांनी मांडले गा-हाणे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : एक दिवसी नंदुरबार दौ:यावर आलेल्या आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांना विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आल़े या वेळी भिल्लीस्थान टायगर सेना व नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत उहापोह करण्यात आला़
भिल्लीस्थान टायगर सेना
अक्कलकुवा तसेच मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्याच्या विविध समस्यांबाबत भिलीस्थान टाईगर सेनेच्या वतीने आरोग्यमंत्री डॉ़ दिपक सावंत यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्य विभागाकडून कोटय़ावधींचा निधी खर्च करण्यात येत असतो़ मात्र, अक्कलकुवासह मोलगी येथील ग्रामीण रुणालयात सुविधाचा अभाव आहे. अक्कलकुवा व मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ सोयी-सुविधा वाढवण्यात याव्यात, दवाखान्यातील सर्व विभाग सुरु करण्यात यावे, रुग्णांसोबत सभ्य वर्तन करण्यात यावे आदी मागण्या भिल्लीस्थानतर्फे करण्यात आल्या आहेत़ या वेळी तालुकाध्यक्ष रुपसिंग वसावे, उपाध्यक्ष संतोष तडवी, गुलाबसिंग वसावे,बन्सीलाल पाडवी, लालसिंग वसावे, अमरसिंग पाडवी, पवन तडवी, जलमसिंग तडवी, उमेश तडवी, संदीप तडवी, प्रदीप तडवी, अरविंद तडवी, विनोद तडवी, अभिषेक पाडवी, योगेश तडवी, प्रदीप पाडवी, रोहित तडवी, गिरधर पाडवी, नरपत तडवी आदी उपस्थित होते.
नर्मदा बचाओ आंदोलन
नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे चेतन साळवे, नूरजी वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी आदींनी डॉ़ सावंत यांना निवेदन दिल़े जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, आरोग्य सेवेसाठी अधिकाधिक यंत्रसामुग्री वाढवावी, प्रस्तावित नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे नवीन पदे वाढविणे या बाबतीत तातडीने मंजुरी देणे, धडगाव येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणे, त्याच प्रमाणे महिला रुग्णालय व सिकलसेल दवाखाना धडगाव येथे सुरु करणे, मानव विकास मिशनअंतर्गत बुडित मजुरी, मातृत्व अनुदान या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े

Web Title: Various organizations organized before minister Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.