भारत बंदसाठी विविध संघटना सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:13 PM2020-12-08T13:13:24+5:302020-12-08T13:13:31+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   मंगळवारच्या भारत बंदमध्ये विविध संघटनांनी पाठींबा दर्शवीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, ...

Various organizations rallied for the closure of India | भारत बंदसाठी विविध संघटना सरसावल्या

भारत बंदसाठी विविध संघटना सरसावल्या

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   मंगळवारच्या भारत बंदमध्ये विविध संघटनांनी पाठींबा दर्शवीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नवापूर ते नंदुरबार अशी जीप व मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. याशिवाय बाजार समित्या देखील बंदमध्ये सहभागी होत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.    
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठींबा म्हणून मंगळवारी आयोजित भारत बंदला विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे. 
राष्ट्रवादी, शिवसेना व कॅांग्रेसचा पाठींबा
बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आघाडी शासनातील तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी केले आहे. याबाबत काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजे यासाठी आयोजित बंदला पाठींबा    आहे. 
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी ॲानलाईन बैठक घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, काॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्याशी चर्चा केली. शिवाय शिवसेना नेेते चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्याशीही याबाबत चर्चा करून बंदमध्ये सहभागी होण्याचे ठरले आहे. सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त पत्रकात तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केले आहे. 
मोटरसायकल रॅली
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे मंगळवारी नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार अशी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपार १२ वाजता नेहरू चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. सहभागी होण्याचे आवाहन रामसिंग गावीत, करणसिंग कोकणी, रणजीत गावीत, दिलीप गावीत, जगन गावीत, आर.टी.गावीत, नंदुरबारचे विक्रम गावीत, मनोहर वळवी, लिलाबाई वळवी, जमनाबाई ठाकरे, बकाराम वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकत्यांनी केले आहे.
संयुक्त किसान आंदोलन समिती
समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशातील ग्रामीण, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनातील जगण्याच्या संघर्षासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले   आहे. पत्रकावर नर्मदा बचाओ आंदोलन, आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, महिला किसान अधिकारी मंच, आई-वडिल आणि ज्येष्ठ नागरिक  संघटना, माकप, फुले, आंबेडकर  स्टडी सर्कल, भिलिस्तान टायगर संघटना, जय आदिवासी ब्रिगेड,  सिद्धार्थ युवक मंच, एकलव्य युवक संघटना, लोकमंच अभ्यास गट, आदिवासी क्रांती दल यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 
लोकसंघर्ष मोर्चा , एमआयएम, प्रहार संघटना देखील या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले  आहे. 

 काही संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने देखील करण्यात येणार आहेत. त्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.  
बंदमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी लक्ष दिले जाणार आहे. 

Web Title: Various organizations rallied for the closure of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.