हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:11+5:302021-09-16T04:38:11+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील आर.एफ.एन.एस. संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय कवी संमेलन ऑनलाईन घेण्यात ...
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील आर.एफ.एन.एस. संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय कवी संमेलन ऑनलाईन घेण्यात आले. उद्घाटन डायरेक्टर य.च.म. नाशिक डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रशांत कसबे, जयहिंद कॉलेज धुळे यांनी शुभेच्छा दिल्या व कवी संमेलनाचे उदघाटन केले. राष्ट्रीय कवी संमेलनात एकूण तीन कवींचा समावेश केला. प्रमुख कवी प्रा.डॉ. दिवाकर दिनेश गौर यांनी हिंदी ‘माथे की बिंदी’ यावर छान कविता सादर केल्या. डॉ. भाग्यश्री एस. वर्मा (मुंबई ) यांनी कोविड १९ च्या परिस्थितीवर कविता सादरीकरण केले तर, डॉ. अल्का सिंग यांनी महिला शक्ती व पखवाडा या विषयावर कविता सादरीकरण केले. यावेळी प्राचार्या डॉ. ज्योती लष्करी, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.योगिता चौधरी, प्रा. वर्षा वसावे उपस्थित होते. सूत्रसंचालन सना मंसुरे तर आभार आरती चंदेल यांनी मानले. याप्रसंगी प्राचार्या डाॅ. ज्योती लष्करी, प्रा.योगिता चौधरी, प्रा.वर्षा वसावे, प्रा.जमिला वळवी, प्रा. पूनम माळी, प्रा. कुसुंबा गावीत, प्रा. गणेश चौधरी, प्रा. कैलास पाटील व इतर कर्मचारी सागर लष्करी, प्रीतेश बाविस्कर, बहादूर पाडवी इत्यादी उपस्थित होते.
के. डी. गावीत विद्यालय, कोरीट
कोरीट, ता. नंदुरबार येथील कृष्णराव दामजी गावीत प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख व्ही.डी. पाटील तर, प्रमुख वक्ते उपशिक्षक पी.एस. पाटील होते. सूत्रसंचालन कलाशिक्षक आर.पी. सोनवणे यांनी केले. याप्रसंगी तत्कालीन शिक्षक प्रशांत भाईदास पटेल यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा भावनिक सत्कार प्राध्यापिका नयना पवार यांनी केला. याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रीय हिंदी दिन, प्रसार व प्रचार यावर कविता, शायरी सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे व्ही.डी. पाटील, पी.एस. पाटील यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व राष्ट्रभाषा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. एस.व्ही. विसपुते यांनी २२ भाषांची माहिती दिली. यासाठी उपशिक्षक एस.एन. पटेल, एम.बी. पाटील, पी.एम. चव्हाण, ए.एस. पाटील, सुनील खाडे, नयना पवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजेंद्र राजपूत यांनी परिश्रम घेतले.