नंदुरबार तालुक्यात वाढणार भाजीपाल्याचे क्षेत्र
By admin | Published: June 9, 2017 12:30 PM2017-06-09T12:30:02+5:302017-06-09T12:30:02+5:30
टमाटे व इतर पिकांना पसंती : पालेभाज्यांसाठी तयारी
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.9 - तालुक्यातील विविध भागात एकीकडे खरीप पिकांच्या लागवडीची तयारी करण्यात येत असताना शेतकरी दुसरीकडे भाजीपाला पिकांच्या लागवडीची तयारी करत आहेत़ कमी दिवसात उत्पादन मिळत असल्याने शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळत आहेत़
नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात कापूस पेरणीसाठी पूर्ण क्षेत्र न देता त्यातील काही क्षेत्र टमाटे, वांगे, गिलके, दोडके, कार्ले, भेंडी, पालक, मेथी, पोकळा यासह इतर भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी तयार करण्यात येत आह़े 30 ते 45 दिवसात येणारा भाजीपाला पावसाळ्यात वेगाने वाढत असल्याने त्याला भावही चांगला मिळत असल्याने शेतकरी दैनंदिन आवक म्हणून भाजीपाला लागवड करत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील शनिमांडळ परिसर, आष्टे परिसर, लहान शहादे, कोरीट, धानोरा व कोपर्ली, भालेर परिसरात भाजीपाला लागवड करणा:यांची सध्या लगबग सुरू आह़े पाऊस पडल्यावर 15 दिवस किंवा 20 दिवसानंतर लागवड करण्याचे शेतक:यांचे नियोजन आहे. नंदुरबार तालुक्यातून अनेक शेतक:यांचा भाजीपाला गुजरात विक्रीसाठी पाठवण्यत येतो़ त्याठिकाणी चांगला दर मिळत असल्याने शेतकरी लागवड वाढवत आहेत़
500 हेक्टरने होणार वाढ
नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात साधारण 1 हजार 200 हेक्टरवर विविध भाजीपाल्याची लागवड करण्यात येत़े यात कांदे आणि हिरवी मिरची याचे क्षेत्र वेगळे आह़े यंदा या क्षेत्रात 500 हेक्टरने वाढ होणार आह़े शेतकरी टमाटे लागवडीसाठी शेतात जागा तयार करत आहेत़ वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी साचा तयार करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आह़े
या भाजीपाल्यासोबतच दिवाळीनंतर लसूण पेरणीची तयारी शेतकरी सुरू करणार आहेत़ साधारण चार महिने घेणा:या लसणाची उत्पादकता गेल्या काही वर्षात वाढल्याने शेतक:यांना चांगला मोबदला मिळाला आह़े