नंदुरबारात भाजीपाल्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:56 PM2018-04-05T12:56:15+5:302018-04-05T12:56:15+5:30

आवक वाढली : अनेक भाज्या पाच रुपये किलो दराने होताय विक्री

Vegetable prices in Nandurbar have collapsed | नंदुरबारात भाजीपाल्याचे भाव गडगडले

नंदुरबारात भाजीपाल्याचे भाव गडगडले

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : जिल्हाभरात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले आह़े व्यवसायात आलेल्या मंदीमुळे भाजीपाला विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आह़े गड्डा कोबी, फ्लॉवर, वांगे, दुधी भोपळा आदी भाज्यांचे भाव कमालीचे खाली कोसळले आहेत़
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला़ त्यामुळे कमी पावसाची आवश्यकता असलेल्या भाजीपाला पिकांची चांगली वाढ झालेली आह़े परिणामी बाजार समितीत भाजीपाल्याची जास्त आवक वाढली असल्याने भाज्यांच्या दरातही घसरण झालेली बघायला मिळत आह़े ऐन उन्हाळ्यात भाजीपाला स्वस्थ मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े तर दुसरीकडे मात्र भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने किरकोळ विक्रेत्यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े भाजीपाल्याला किंमत नसल्याने हा भाजीपाला गुरांना चारा म्हणून टाकण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आह़े तालुक्यातील पश्चिमेकडील गाव पाडय़ातून नंदुरबारात मोठय़ा संख्येने भाजीपाल्याची आवक होत असत़े यंदा पजर्न्यमान कमी असल्याने साहजिकच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या पिकांची चांगली वाढ झाली होती़ त्यामुळे आवक वाढली आह़े दरम्यान, भाजीपाल्याचे भाव कोसळले असले तरी, लिंबू, कोथंबीरीचे भाव मात्र चढे आह़े 
भाव नसल्याने नाराजी
भाजीपाला पिकाचे भरपूर उत्पन्न निघाल्याने आवक वाढली आह़े त्यामुळे भाजीपाल्यास भावही मिळत नसल्याने गुजरात राज्यालगत असलेल्या भाजीपाला उत्पादकांनी आपला माल नंदुरबार येथील बाजार समितीत न देता गुजरात राज्यात विकण्याला प्राधान्य दिले आह़े या ठिकाणी भाजीपाल्याला योग्य भाव नाही तसेच भाजीपाल्याचा वाहतूक खर्चही जास्त असल्याने हे शेतक:यांना परवडणारे नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े 
गृहिणींमध्ये आनंद
भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने ब:यापैकी स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत आह़े यामुळे गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आह़े घरातील बजट बहुतेक ठिकाणी गृहिणींच्याच हातात असतो़ भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने गृहिणींचे दोन पैसेही शिल्लक पडणार आहेत़ त्यामुळे त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Vegetable prices in Nandurbar have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.