नंदुरबारात व्यापा-यास मारहाण करून वाहन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:20 PM2018-05-17T12:20:36+5:302018-05-17T12:20:36+5:30

दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण : दोन तासात वाहनासह दोघे संशयित ताब्यात

Vehicle Lampas by striking businessman in Nandurbar | नंदुरबारात व्यापा-यास मारहाण करून वाहन लंपास

नंदुरबारात व्यापा-यास मारहाण करून वाहन लंपास

Next


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यापा:यावर हल्ला करून मारहाण करीत त्याची दुचाकी लंपास केल्याची घटना नंदुरबारातील नेहरू चौक ते बसस्थानक रस्त्यावर घडली. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून दोघा संशयितांसह व्यापा:याची दुचाकीदेखील ताब्यात घेतली. दरम्यान, याच दोन संशयितांनी मंगळवारी रात्री रेल्वेस्थानकात टीसीला मारहाण केल्याचे समजते.
विशाल उर्फ गटल्या शैलेंद्र लहाने, रा.शासकीय निवासस्थान, टोकरतलाव रोड, नंदुरबार आणि नयन अनील भदाणे, रा. देसाई पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार असे ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत. नंदुरबारातील कायदा व सुव्यवस्थेला वळण लागत असतानाच काही समाजकंटक मध्येच डोके वर काढून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच प्रकार बुधवारी सकाळी घडला. याबाबत शहर पोलिसात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनाचा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील माणिक चौकातील कापड व्यापारी सुरेश जैन हे सकाळी नऊ वाजता अहमदाबाद येथील कापड व्यापा:यास आपल्या दुचाकीने बसस्थानक परिसरात पोहचविण्यासाठी जात होते. नवशक्ती कॉम्प्लेक्स ते बसस्थानक रस्त्यावरील वळणावर एका दुचाकीला त्यांच्या दुचाकीचा धक्का लागला. त्या कारणावरून दोन युवकांनी त्यांना थांबविले. त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. ही गडबड पाहता अहमदाबाद येथील व्यापारी तेथून पळाले. नंदुरबारचे कापड व्यावसायिक यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या झटापटीत व्यापारी सुरेश जैन यांनी तेथून पळत जाऊन शहर पोलीस ठाणे गाठले. तेथेही त्यांना लागलीच मदत मिळू शकली नाही. इकडे दोघा संशयित युवकांनी दुचाकी घेऊन पोबारा केला. व्यापारी जैन यांनी लागलीच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र जैन, मनीष जैन व इतर व्यापा:यांना आपबिती सांगितली. व्यापारीदेखील लागलीच पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक रमेश पवार यांना घटना सांगितली. त्यांनी लागलीच दखल घेतली.

Web Title: Vehicle Lampas by striking businessman in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.