एक लाखासाठी लोणखेडा येथील विवाहितेचा छळ
By admin | Published: June 20, 2017 12:40 PM2017-06-20T12:40:23+5:302017-06-20T12:40:23+5:30
किराणा दुकानासाठी माहेरून एक लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा:या पतीसह सहा जणांविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
Next
ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.20 : किराणा दुकानासाठी माहेरून एक लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा:या पतीसह सहा जणांविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
लामकाणी ता़ धुळे येथील सुनिता यांचा विवाह लोणखेडा ता़ शहादा येथील हिंमत दिलीप सोनवणे यांच्यासोबत मे 2015 मध्ये झाला होता़ हिंमत हा सूतगिरणी येथे नोकरीस आह़े गेल्या दीड वर्षापासून सुनिता हिचा पती हिंमत हा लामकानी येथील माहेरून एक लाख रूपये आणावेत यासाठी छळ करत होता़ स्वयंपाक करता येत नाही, यासह इतर किरकोळ कारणावरून पतीसह सासूू-सासरे हे शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने सुनिता ही त्रस्त झाली होती़ पती हिंमत याने मी दुसरे लगA करून घेतो अशी धमकी दिल्यानंतर सुनिताबाई हिने शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आह़े
याप्रकरणी पती हिंमत, सासरे दिलीप राजाराम सोनवणे, सासू वत्सलाबाई, आजे सासरे राजाराम महारू सोनवणे, आजे सासू शांताबाई, दिर भगवान सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े