नवापुरात मोबाईलमध्ये चित्रीकरण करून युवतीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:58 PM2018-07-28T12:58:06+5:302018-07-28T12:58:14+5:30
Next
<p>नवापूर : मोबाईलमध्ये अल्पवयीन युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रण करून तिच्यावर दबाव टाकून तिघा युवकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची गंभीर व संतप्त घटना नवापूर येथे घडली. दरम्यान युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने नवापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत येथील चर्मकार समाजाने शाळकरी मुलींच्या हस्ते प्रशासनाला निषेधाचे निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येथील देवळफळी भागात राहणा:या 16 वर्षीय अल्पवयीन युवतीने 21 जुलै रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अधिक तपासाअंती मयत युवतीस आत्महत्येला प्रवृत्त केले गेले. या अनुषंगाने पोलीसांनी मुलीच्या आईची फिर्याद दाखल करीत महेश पवार, जावेद मुनाफ शेख व आरीफ शेख (घडीयाली) यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण व सुरक्षा अधिनियम कलम 12, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम व इतर कलमान्वये 26 रोजी रात्री गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक केली.
दरम्यान, मुलीने आत्महत्या करण्याआधी आरोपींनी संगनमत करून युवतीचे आक्षेपार्ह फोटो व छायाचित्रण मोबाईल मध्ये करून तीची फसवणूक करीत शारीरिक व मानसिक रित्या त्रास दिला. हा त्रास असह्य झाला व समाजात बदनामी होईल ह्या भितीने युवतीने आत्महत्या केली होती. नवापूर पोलिसांनी बारकाईने तपास करीत घटना उघडकीस आणून आरोपींना गजाआड केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनीही भेट देऊन तपास व गुन्ह्याची माहिती घेतली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.संत रोहिदास चर्मकार समाज विकास संस्था व राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना घटनेच्या निषेधार्थ शाळकरी मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, नगरसेवक विशाल सांगळे, मनोहर नगराळे, समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, भगवान अहिरे, रतिलाल अहिरे, उखडु झांझर, जितेंद्र अहिरे, विजय ठाकरे, जयेंद्र चव्हाण, तुकाराम अहिरे, नथ्थु अहिरे, मधु अहिरे, वामन अहिरे, छोटालाल चव्हाण, राजाराम ठाकरे आदींच्या सह्या आहेत.