कौटूंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांना पोलीस दादा देणार ‘भरोसा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:55 AM2019-07-12T11:55:38+5:302019-07-12T11:55:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कौटूंबिक वाद, कलह आणि समस्यांमुळे हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांसाठी पोलीस दलाने भरोसा सेल अर्थात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कौटूंबिक वाद, कलह आणि समस्यांमुळे हिंसाचाराच्या बळी ठरणा:या महिलांसाठी पोलीस दलाने भरोसा सेल अर्थात महिला सहाय्य कक्षाची स्थापना केली आह़े जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला़
कार्यक्रमास पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, बाळासाहेब भापकर, राकेश चौधरी, जिल्हा संरक्षण अधिकारी बी़आऱराणे, अॅड़उमा चौधरी, डॉ़ तेजल चौधरी, कंचन मुलाणी, शितल चौधरी, पल्लवी चौधरी, जिल्हा बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅड़सिमा खत्री, सुप्रिया कोतवाल, अॅड़रश्मी महाले, अॅड़ दिपाली चौधरी, अॅड़ प्रज्ञा वडनगरे, मालती वळवी, मनिषा निकम, योगिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील 100 महिला कार्यकत्र्या व पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या़
पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्याहस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर हेल्पलाईन व टोल-फ्रि नंबर कार्यान्वित करण्यात आला़
कार्यक्रमात बोलताना संरक्षण अधिकारी राणे यांनी सांगितले की, कौटूंबिक हिंसाचारातून रात्री अपरात्री घरातून बाहेर काढल्या जाणा:या व कौटूंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिलांना आश्रय म्हणून वन स्टॉप क्रायसी सेंटर जिल्हा रुग्णालयात सुरु होणार आह़े याठिकाणी महिलांना एकाच छताखाली पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधी सेवा, मानसोपचार तज्ञ, पुनर्वसन आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था केली जाणार आह़े
भरोसा सेलद्वारे महिला आणि तिचे कुटूंबिय या दोघांचे समुपदेशन करुन तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आह़े पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक रचना शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजया बोराडे, पुष्पलता जाधव, प्रमिला वळवी हे काम पाहणार आहेत़ महिलांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होईल़