VIDEO: नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By Admin | Published: January 6, 2017 05:31 PM2017-01-06T17:31:50+5:302017-01-06T18:13:51+5:30
ऑनलाइन लोकमत नंदुरबार, दि . 6 - नोटबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी ...
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि . 6 - नोटबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नोटाबंदी आणि त्या अनुषंगाने जनतेचे झालेले हाल याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि नोटाबंदीतून झालेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता नवापूर चौफलीवरून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही गेटवर पक्ष कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे केंद्रीय निरिक्षक संदीप मंगरोला, जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, विद्यमान उपाध्यक्ष सरवरसिंग नाईक, तळोदा तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रवींद्र पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष सुभाष राजपूत, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वसावे, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, सभापती दत्तू चौरे, विक्रमसिंग वळवी, बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती डॉ.सयाजी मोरे, सुरेश शिंत्रे आदी उपस्थित होते.
https://www.dailymotion.com/video/x844ngp