Vidhan Sabha 2019 : आंतरराज्य 16 तर आंतर जिल्हा सिमेवर 10 ठिकाणी चेक पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:26 PM2019-09-24T12:26:02+5:302019-09-24T12:26:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक काळात अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सिमेवर 16 तर आंतर जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक काळात अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सिमेवर 16 तर आंतर जिल्हा सिमेवर 10 ठिकाणी तपासणी नाके राहणार आहेत. महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशच्या प्रशासकीय अधिका:यांच्या बॉर्डर मिटिंगमध्ये ही माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बॉर्डर मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तापी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी कैलास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भाऊसाहेब बच्छाव, तापी जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक ए.के.पटेल, डांग जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक आर.डी.कावा उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, मतदानाच्या दोन दिवस पूर्वी जिल्ह्यात ड्राय डे असणार आहे. त्यावेळी शेजारील राज्यातील पोलीसांनी जिल्ह्याला जोडणा:या मार्गावर विशेष लक्ष द्यावे. महसूल, पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी एकत्रितपणे जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापना सील करतील. अवैध दारूची वाहतूक थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकात चांगली कामगिरी करणा:या अधिकारी-कर्मचा:यांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील जिल्ह्याच्या सहकार्याने निवडणूक चांगल्यारितीने पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार स्थिर सर्वेक्षण पथक आणि चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अवैध मद्य व शस्त्रांची वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सीमेवर 16 ठिकाणी तर आंतर जिल्हा सीमेवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
विविध गुन्ह्यातील फरार असलेल्या व्यक्तींची यादी शेजारील राज्यातील अधिका:यांना देण्यात येईल. या गुन्हेगारांची माहिती देण्याबाबत व सीमेवर नाकाबंदी करण्याबाबत गुजरात व मध्य प्रदेशच्या अधिका:यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.