Vidhan Sabha 2019 : चारही मतदारसंघासाठी आठ हजार कर्मचारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:39 PM2019-09-23T12:39:06+5:302019-09-23T12:39:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकुण 8,310 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकुण ...

Vidhan Sabha 2019: Eight thousand employees are appointed for all four constituencies | Vidhan Sabha 2019 : चारही मतदारसंघासाठी आठ हजार कर्मचारी नियुक्त

Vidhan Sabha 2019 : चारही मतदारसंघासाठी आठ हजार कर्मचारी नियुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकुण 8,310 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकुण 1,385 मतदान केंद्रांवर 12 लाख 24 हजार 420 मतदार मतदान करणार आहेत.   चारही मतदारसंघांना आंतरराज्य सिमा जोडली गेली असल्याने निवडणूक काळात विशेष दक्षता घेतली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली. 
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी सांगितले, नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा मतदार संघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सहा लाख 12 हजार 389 पुरुष तर सहा लाख 12 हजार 27 महिला मतदार आहेत. तृतीयपंथी 13 मतदार आहेत. एकुण 12 लाख 24 हजार 429 मतदार जिल्ह्यात आहेत. या मतदारांसाठी 1,385 मतदान केंद्र राहणार आहेत. यात पाच मतदान केंद्र हे सहाय्यकारी मतदान केंद्र असतील. 
मतदान प्रक्रियेसाठी आठ हजार 310 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. 2,559 बॅलेट युनिट, 1,821 कंट्रोल युनिट आणि 1,886 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. चारही मतदार संघांमध्ये प्लायींग स्कॉड, व्हिडीओ चित्रीकरण पथक, खर्च आढावा पथक नेमण्यात आले आहे. आचारसंहितेविषयी तक्रार असल्यास मतदारांना थेट निवडणूक निर्णय अधिका:यांशी संपर्क साधता येणार आहे. त्याकरीता सीव्हीजल अॅप्स ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
जिल्ह्यात 2,766 दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदानासाठीची आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 550 व्हिलचेअर खरेदी करण्यात आलेले आहेत त्याचा वापर यावेळी करण्यात येईल. 
अक्कलकुवा मतदार संघात धनखेडी, निंबापाटी, भादल या मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे. शहादा मतदार संघात कोटबांधणीला नागङिारी, शहाद्याच्या नाईक विद्यालयातील केंद्राला तेथीलच एक खोली, शहाद्यातील शारदा कन्या विद्यालयातील केंद्राला तेथील एक खोली आणि म्युनिसीपल हायस्कूलच्या मतदान केंद्रासाठी  दक्षीणेकडील इमारतीतील खोली सहायकारी मतदान केंद्र म्हणून उपयोगात येणार आहे. नंदुरबार मतदार संघात मिशन विद्यालयातील केंद्राला तेथीलच एक खोली सहायकारी मतदान केंद्रासाठी राहील. तर नंदुरबारचे पटेल छात्रालय, अभिनव विद्यालयातील दोन अशा तीन मतदान केंद्रात किरकोळ बदल करण्यात आला आहे. नवापूर मतदार संघात गुजराथी हायस्कूल, जि.प.गुजराती शाळा, जुना सरकारी दवाखान्याजवळ गुजराती शाळा, देवलीपाडा, आष्टे जि.प.शाळेतील मतदान केंद्रात बदल करण्यात आला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली. 
यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनीही माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, एमसीएमसी कमिटीचे डॉ. किरण मोघे उपस्थित होते. 
 

Web Title: Vidhan Sabha 2019: Eight thousand employees are appointed for all four constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.