Vidhan Sabha 2019: नंदुरबार, अक्कलकुवा निवडणूक निर्णय अधिकारी बदलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:32 PM2019-09-24T12:32:09+5:302019-09-24T12:32:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलविण्यात आले आहे. जिल्हाबाहेरील अधिकारी ...

Vidhan Sabha 2019: Nandurbar, Akkalkuwa Election Decision Officer changed | Vidhan Sabha 2019: नंदुरबार, अक्कलकुवा निवडणूक निर्णय अधिकारी बदलवले

Vidhan Sabha 2019: नंदुरबार, अक्कलकुवा निवडणूक निर्णय अधिकारी बदलवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलविण्यात आले आहे. जिल्हाबाहेरील अधिकारी त्यासाठी नेमण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंदुरबारसाठी प्रांताधिकारी महेश सुधळकर तर अक्कलकुवासाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशी कामकाजही पाहिले. नंतर दुस:याच दिवशी दोघा अधिका:यांना बदलण्यात आले. 
नंदुरबारसाठी उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांची तर अक्कलकुवा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी जिल्हाबाहेर कार्यरत आहेत. 
दोन्ही निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलण्यात आल्याने जिल्हा प्रशासनात चर्चा रंगली आहे. दरम्यान, स्वाती थवील आणि राहुल पाटील यांनी निवडणुकीचा कार्यभार सांभाळला असल्याचे प्रशासनाने सांगितले. 
 

Web Title: Vidhan Sabha 2019: Nandurbar, Akkalkuwa Election Decision Officer changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.