सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:39 AM2020-01-10T11:39:16+5:302020-01-10T11:39:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी संपर्क साधला असून मुंबईतही काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री के.सी.पाडवी व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्याकडे अधिकृतपणे गटाची स्थापना केली.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालानंतर त्रिशंकु अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. गुरुवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही, परंतु संपर्क साधण्यात आले.
सत्तेचे समिकरण बसविण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजप नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजप सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्रबळ दावा आहे. सेनेची साथ घेण्यास भाजप तयार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप पक्ष पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे काँग्रेसचे नेते मंत्री अशोक चव्हाण व शिवसेना नेते संजय राऊत यांची बैठक झाल्याचे वृत्त असून पालकमंत्री के.सी.पाडवी हे देखील सक्रीय झाले आहेत. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी देखील शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. अद्याप शिवसेनेशी संपर्क साधला गेला नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य तथा माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत व मधूकर नाईक यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. ही पारिवारीक भेट असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतर्फे रघुवंशी यांनी त्यांची भगवी शाल देत स्वागत केल्याने राजकीय चर्चेला अधीकच ऊत आला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत सदस्य तथा स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेबाबत वेगवेगळे समिकरण मांडले जात असल्याने हुडहूडी भरणाºया थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेनतर्फे जिल्हाधिकाºयांकडे गटस्थापन करण्यात आला. भाजप व काँग्रेसतर्फे शुक्रवारी गट स्थापन केला जाणार असल्याचे समजते.